Sections

द्रविडच्या मागणीमुळे सर्वांना मिळणार समान पैसे

वृत्तसंस्था |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Rahul Dravid

मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने उपस्थित केला होता.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड याने सर्वांना समान बक्षीस रक्कम वाटून देण्याची केलेली मागणी बीसीसीआयकडून मान्य करण्यात आली आहे. आता प्रशिक्षक, खेळाडू व संघ व्यवस्थापनाला समान रक्कम देण्यात येणार आहे.

मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने उपस्थित केला होता. द्रविडने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा प्रश्न करत सर्वांनाच समान रक्कम द्यावी अशी मागणी केली होती.

बीसीसीआयने भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर राहुल द्रविडला 50 लाख, खेळाडूंना 30 लाख आणि संघ व्यवस्थापनाला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

आता द्रविडची ही मागणी मान्य करत बीसीसीआयने प्रत्येकाला 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. संघाला प्राधान्य देणाऱ्या द्रविडने स्वतःचे नुकसान करून सर्वांना समान बक्षीस देण्याची मागणी केल्याने त्याचे कौतुक करण्यात येत होते. आता ही मागणी मान्य झाली आहे. याबरोबरच विश्वकरंडकावेळी निधन झालेले व्यवस्थापनातील सदस्य राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांनीही योग्य ती रक्कम देण्यात येणार आहे. 

Web Title: cricket news Rahul Dravids Demand for Equal Pay for India U19 Support Staff Met

टॅग्स

संबंधित बातम्या

INDvsPAK Match The girl was finally identified
Asia Cup : अखेर त्या तरुणीची ओळख पटली

दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या...

#ChorPMChupHai Top Trend on Twitter
#ChorPMChupHai ट्रेंड ट्विटरवर टॉप टेनमध्ये

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे...

chimur
चिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग

चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...

Asia Cup
Asia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज

दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या...

Rahul Gandhi
मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...