Sections

महाड - विद्यार्थ्यांनी जत्रेत घेतले व्यावसायिक शिक्षणाचे धडे

सुनील पाटकर |   बुधवार, 4 एप्रिल 2018

महाड : जत्रा म्हणजे उत्साह, भरपूर आनंद अशा उल्हासित जत्रेत खूप काही अनुभवयाला मिळते. याच जत्रेचा वलंग येथील शिक्षकांनी मुंलांसाठी एक शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग केला.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसयिक कौशल्येही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत यासाठी महाड तालुक्यातील वलंग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी वलंग गावच्या जत्रेत इडली आणि चहाचा स्टॉल टाकून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे घेतले. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आयबीटी) विषयांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. येथे पर्यावरण विषयक जागरुकता करत इडली विक्रिसाठी कागदी पिशव्यांचा वापरही करण्यात आला.

महाड : जत्रा म्हणजे उत्साह, भरपूर आनंद अशा उल्हासित जत्रेत खूप काही अनुभवयाला मिळते. याच जत्रेचा वलंग येथील शिक्षकांनी मुंलांसाठी एक शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग केला.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसयिक कौशल्येही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत यासाठी महाड तालुक्यातील वलंग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी वलंग गावच्या जत्रेत इडली आणि चहाचा स्टॉल टाकून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे घेतले. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आयबीटी) विषयांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. येथे पर्यावरण विषयक जागरुकता करत इडली विक्रिसाठी कागदी पिशव्यांचा वापरही करण्यात आला.

वलंग शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू इंग्लिश स्कुल, वलंग ही शाळा मूलभूत तंत्रज्ञानाचा विकास साधण्यासाठी, उद्योजकता वाढविण्यासाठीचे शिक्षण देणारी शाळा आहे. 2017-18 वर्षापासून आयबीटी विषयांतर्गत अभियांत्रिकी,ऊर्जा आणि पर्यावरण, शेती आणि पशुपालन, गृह आणि आरोग्य हे उपविषय शिकविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय 25%,पॉलीटेक्निकसाठी 15%, 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी 40 % अशाप्रकारे उपलब्ध जागांपैकी आरक्षित जागा म्हणून सूट मिळते.

अभियांत्रिकी विषयांतर्गत विद्यार्थी आता चांगल्याप्रकारे वेल्डिंग करत आहेत.ऊर्जा आणि पर्यावरण अंतर्गत लाईट फिटिंग शिकले आहेत.तर शेती आणि पशुपालन अंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मेथीची लागवड करून त्याची विक्रीही केली आहे.विद्यालयात आयबीटी विषय अंतर्भूत करण्यासाठी प्राईड इंडिया महाडचे विशेष सहकार्य आहे,त्यांच्या मार्गदर्शनाने,संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविले जात आहेत.या पुढे जाऊन यावर्षी 31 मार्चला झालेल्या जत्रेत विद्यार्थ्यांनी इडली,चहा या खाद्यपदार्थांच्या स्टॉल सुरु केला.

स्वतः विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्व व्यवहार पहात होते. व्यवहारज्ञान विद्यार्थी स्वतः अनुभवत होते. विशेष म्हणजे पार्सल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या विद्यार्थ्यांनी कागदाच्या बनविल्या होत्या तसेच चहाचे कपदेखील कागदिच वापरले होते.त्यामुळे प्लास्टिक मुक्तीचा संदेश देखील या जत्रेतून दिला गेला. या उपक्रमात आठवी व नववीतील 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या करिता मुख्याध्यापक वसंत सुळ, शिक्षक राजन कुर्डूनकर, गंगाधर साळवी, समीर गोगावले, सोनाली पंदिरकर, अंकित पंदिरकर, रुपेश धामणस्कर, श्याम गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष महादेव कुर्डूनकर,कार्यवाह अनंत रेवाळे, सदस्य प्रभाकर सागवेकर, माजी विद्यार्थी दीपक कुर्डूनकर, किशोर विचारे, राजन धाडवे, सदानंद वाळंज यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. वलंगच्या जत्रेत एक खास निराळा आणि स्तुत्य उपक्रम म्हणून सर्वांनीच शाळा,संस्था आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले.

Web Title: Students take professional education lessons in mahad

टॅग्स

संबंधित बातम्या

pali.
अपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस

पाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग...

pali
उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव

पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...

pune.jpg
शिवसंग्राम आपली ताकद भाजपच्या मागे उभी करणार

महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित...

pune.jpg
संगणक हाताळण्यासाठी डोके अन् नाक ठरतील उपयुक्त

टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर...

Completing Highway Work Beside Government Rules
महामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल

महाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...

crime-logo.jpg
आंबेनळी दुर्घटनेतील मृत चालकावरच गुन्हा दाखल

महाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार...