Sections

स्वाभिमानला "जग', गाव आघाडीला "टोपी' 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 मार्च 2018

कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात "जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना "टोपी' ही निशाणी आहे. 

कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात "जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना "टोपी' ही निशाणी आहे. 

स्वाभिमानतर्फे नगराध्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या समीर नलावडे यांना कपबशी तर गाव आघाडीचे राकेश राणे यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. याखेरीज भाजपचे संदेश पारकर यांना "कमळ' तर कॉंग्रेसचे विलास कोरगावकर यांची "हात' ही निशाणी आहे. 

नगरपंचायत उमेदवारांना चिन्ह वाटपासाठीची सभा तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता सुरू झाली. मात्र उमेदवारांचा पत्ता नव्हता, त्यामुळे अर्धातास थांबून उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत-शिंदे, तहसीलदार वैशाली माने, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते. 

शहरातील प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली चिन्हे

प्रभाग 1. कविता किशोर राणे- हात, वैभवी विजय राणे - जग, सुवर्णा चंद्रशेखर राणे- धनुष्यबाण.

प्रभाग 2 : साक्षी संतोष आमडोस्कर - धनुष्यबाण, रोहिणी लक्ष्मण पिळणकर - कमळ, संजना संजय सदडेकर - हॅट, प्रतीक्षा प्रशांत सावंत- जग, दिव्या दिनेश साळगावकर - हात.

प्रभाग 3 : अभिजित भास्कर मुसळे- जग, अजित यशवंत राणे- हॅट, रवींद्र हरी राणे- कमळ.

प्रभाग 4 : अबिद अब्दुल नाईक- घड्याळ, श्रीकृष्ण रमेश निकम- हॅट, धोंडू तातू परब- कमळ, भिवा वसंत परब - हात. 

प्रभाग 5 : ऋतुजा ऋषिकेश कोरडे- हात, मेघा अजय गांगण- जग, अश्विनी गजानन मोरये - धनुष्यबाण.

प्रभाग 6 : सुमेधा सखाराम अंधारी- कमळ, प्रियाली सुरेंद्र कोदे- जग, विजयश्री महेश कोदे - हात.

प्रभाग 7 : उत्कर्षा उत्तम धुमाळे- कमळ, सुप्रिया समीर नलावडे- जग.

प्रभाग 8 : अर्पिता अमित कांबळे- हॅट, वैजू अनंत कांबळे - कमळ, उर्मी योगेश जाधव - जग, भक्ती भाई जाधव- मेणबत्ती.

प्रभाग 9 : शैलेजा पांडुरंग कदम - कॅमेरा, दर्शना गणपत चव्हाण- हॅट, पूजा संजय राणे- हात, पूजा विनोद सावंत -जग, मेघा महेश सावंत- कमळ 

प्रभाग 10 चा निर्णय प्रलंबित असल्याने या प्रभागातील उमेदवारांना आज चिन्ह वाटप झालेले नाही.

प्रभाग 11 : महानंद राजाराम चव्हाण- हात, सुजित प्रकाश जाधव- धनुष्यबाण, लवू लक्ष्मण पवार - कमळ, सुभाष भोसले- जग.

प्रभाग 12 : शैलेंद्र बबन नेरकर - शिट्टी, गणेश सोनू हर्णे - जग, गौरव भानुदास हर्णे- कमळ.

प्रभाग 13 : विलास बाळकृष्ण कोरगावकर- हात, सुशांत श्रीधर नाईक- धनुष्यबाण, संजय बाबी मालंडकर - जग.

प्रभाग 14 : सुरेंद्र सुधाकर कोदे - जग, राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर- कमळ, संजय शांताराम पारकर- धनुष्यबाण 

प्रभाग 15 : ज्योतिका जीवनप्रकाश माणगावकर - जग, मानसी योगेश मुंज- धनुष्यबाण.

प्रभाग 16 : नरेंद्र नारायण आजगावकर- कमळ, संजय मधुकर कामतेकर- जग, राजेंद्र मधुकर वर्णे -हात, उमेश सहदेव वाळके - शिट्टी.

प्रभाग 17 : रवींद्र बाळकृष्ण गायकवाड- जग, सुभाष महादेव चव्हाण- हात, विलास पांडुरंग जाधव - धनुष्यबाण. मारुती श्रीधर राणे- हॅट. 

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election

टॅग्स

संबंधित बातम्या

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर

औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...

deshmukh
माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...

औरंगाबाद - अगरबत्तीचे पॅंकिंग करताना दिव्यांग प्रतिष्ठानचे सदस्य.
दिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास

औरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...