Sections

पर्यटक अनुभवणार व्हॅली क्रॉसिंगचा थरार

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 26 एप्रिल 2018

रत्नागिरी - रत्नागिरीत येणारे पर्यटक व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवणार आहेत. २५० फूट उंचीवरून ९०० फूट लांबीच्या दोरावरून कोकणचा निसर्ग व समुद्रकिनाऱ्याचे विलोभनीय सौंदर्य पर्यटकांना आस्वाद देणारे आहे. येत्या २८ एप्रिलपासून हा उपक्रम चालू होणार असून १ मेपर्यंत चालणार आहे.

रत्नागिरी - रत्नागिरीत येणारे पर्यटक व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवणार आहेत. २५० फूट उंचीवरून ९०० फूट लांबीच्या दोरावरून कोकणचा निसर्ग व समुद्रकिनाऱ्याचे विलोभनीय सौंदर्य पर्यटकांना आस्वाद देणारे आहे. येत्या २८ एप्रिलपासून हा उपक्रम चालू होणार असून १ मेपर्यंत चालणार आहे. मॅंगो सिटी पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेला रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष शेखर मुकादम, उपाध्यक्ष वल्लभ वणजू, फिल्ड ऑफिसर गणेश चौघुले, जितेंद्र शिंदे, फिल्ड इन्स्ट्रक्‍टर किशोर सावंत उपस्थित होते. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स ही रत्नागिरीमधील नामांकित व कोकणातील पहिली नोंदणीकृत गिर्यारोहण संस्था आहे. १९९४ मध्ये संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला साहसी खेळ, शिबिरे आयोजित करता करता व्हॅसी क्रॉसिंग, रॉक क्‍लायंबिंग असे उपक्रम संस्थेने सर्वप्रथम सुरू केले. व्हॅली क्रॉसिंगसाठी दरवर्षीप्रमाणे भाट्ये टेबल पॉईंटची निवड करण्यात आली आहे. संस्थेकडे या उपक्रमासाठी लागणारे लाखो रुपयांचे साहित्य उपलब्ध आहे.

संस्थेच्या ११ सदस्यांनी इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनच्या अधिकृत इन्स्टिट्यूटमधून १ महिन्याचा हिमालयात बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स चांगल्या श्रेणीत पूर्ण केला आहे. तसेचे एका सदस्याने ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स यशस्वी पूर्ण केला आहे. व्हॅली क्रॉसिंग हा उपक्रम यापूर्वी संस्थेने सात वेळा यशस्वीपणे आयोजित केले आहे. संस्थेचे अनुभवी आउटडोअर इन्स्ट्रक्‍टर्स या दरम्यान उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमात पहिल्या दोनशे जणांना व्हॅली क्रॉसिंगची संधी मिळणार आहे. यामध्ये सहभागी सर्वांना स्नॅक्‍स, इव्हेंट सर्टिफिकेट, फर्स्ट एड, ग्रुप इन्शुरन्स देण्यात येणार आहे. हा उपक्रम रत्नागिरी आणि कोकणच्या पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. या साहसी व थरारक कार्यक्रमाचे नियम, प्रवेश आदी माहितीसाठी रत्नदुर्ग माउंटेनिअर्स द्वारा प्रकाश वस्तू भांडार, विठ्ठल मंदिर जवळ, एमजी रोड बाजारपेठ, रत्नागिरी, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मूकबधिर विद्यार्थ्यांनाही संधी सामाजिक बांधिलकी जपत रत्नदुर्गने येथील कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना २८ एप्रिलला व्हॅली क्रॉसिंग या साहसी क्रीडा प्रकाराचा आनंद लुटण्याची संधी दिली आहे. जेणेकरून ही मुलेसुद्धा धाडसी आहेत, असा संदेश लोकांमध्ये पोहोचेल.

Web Title: Ratnagiri News Valley crossing in Konkan

टॅग्स

संबंधित बातम्या

कास पठारावर फुलांचा नजराणा! 

कास - जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास पठारावर सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देवून...

महाल ः नाग नदी सौंदर्यीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसोबत निदर्शने करताना राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्‍वर पेठे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर व इतर.
नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध

नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध नागपूर : नाग नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंची प्रत्येकी 15 मीटर जागा आरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात या परिसरातील...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....

satana
उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...