Sections

नाणारवरून तावडे यांनी काढला खासदार राऊत यांचा चिमटा

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 10 मे 2018

रत्नागिरी -  नाणार जाणार की राहणार याची कोकण वाट पाहणार असा चिमटा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला. निमित्त होते आडिवरे ता राजापूर येथे तावडे अतिथी भवनाचे.

रत्नागिरी -  नाणार जाणार की राहणार याची कोकण वाट पाहणार असा चिमटा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला. निमित्त होते आडिवरे ता राजापूर येथे तावडे अतिथी भवनाचे.

कोकणामध्ये महामार्ग चोपदरीकरण, विमानतळ, सागरी महामार्ग या रूपाने विकास सुरू आहे, पण नाणार हा विषय बाजूला ठेवा. आज या व्यासपीठावर मी तावडे याना विनंती करतो. विनोद तावडे यांचा शब्द या सरकारमध्ये प्रमाण मानला जातो, असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी नाणार विषय छेडला.

आडिवरे (ता. राजापूर) येथे आयोजित तावडे भवन उद्घाटन सोहळा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमाला वर्षा तावडे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, उद्योजक सुरेश कदम, नवेदरचे सरपंच बंधू शेट्ये, उल्का विश्वासराव, कुमार शेट्ये, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, शंकरराव तावडे, वास्तुविशारद संतोष तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष हरीश परब आदी उपस्थित होते.

आमदार भास्कर जाधव म्हणाले, तावडे मंडळाचे काम मोठे आहे. संस्थेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही मंडळाचे वय वाढते तसे ते अनुभव संपन्न होते आणि कार्यक्षमता वाढते. ते चिरतरुण राहते. शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा. 

आज राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, पण त्यांच्या पायाला जखम झाल्याने ते येऊ शकले नाही. दुर्धर आजारातून बरे होऊन ते 15 तास काम करत आहेत. ते येत नसल्याने मी आज शुभेच्छा देण्यासाठी आलोय. 

- भास्कर जाधव, आमदार

सतीश तावडे यांनी प्रास्ताविक केले, वास्तुविशारद संतोष तावडे यांनी तावडे व आडिवरे यांचा इतिहास सांगितला. भविष्यात पर्यटनाच्या नकाशावर तावडे भवन येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Ratnagiri News Tavade Bhavan Inauguration

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

mbl-ban
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक डिसेंबरपासून मोबाईल बंदी

चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...