Sections

‘सह्याद्री’च्या विद्यार्थ्यांचा कल्पक आविष्कार

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 4 एप्रिल 2018

सावर्डे - सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभियांत्रिकीतील एस क्रिएटर आविष्कार प्रदर्शनात सादर करून जाणकारांची दाद मिळवली.

सावर्डे - सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभियांत्रिकीतील एस क्रिएटर आविष्कार प्रदर्शनात सादर करून जाणकारांची दाद मिळवली. येथील प्रदर्शनात २२ प्रकल्प असून, दुचाकी, चारचाकी, अमेरिकन बनावटीची कार, सौरउर्जेवर चालणारी रिक्षा, विविध ॲप्स, वेबसाईट आदींचा समावेश आहे. १२०० सीसी क्षमतेची २००० किलो वजनाची  ‘टेरिरन’ ही अमेरिकन बनावटीची लक्षवेधी मोटार बनवली आहे. प्राचार्य मंगेश भोसले यांनी ही तर भारतातील सर्वांत कमी किमतीची कार ठरू शकेल, असे मत व्यक्त केले आहे.

मन, मनगट आणि मेंदूचा मिलाफ झाला की अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या जोरावर सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालयात सहा कार व दोन मोटारसायकलींचे अनावरण करण्यात आले. ‘टेरिरन’ मोटार लक्षवेधी ठरली आहे. १२०० सीसी क्षमतेची २००० किलो वजनाची १५ फूट लांबी असणारी आकर्षक ‘टेरिरन’ ही अमेरिकन बनावटीची मोटार केवळ नऊ महिन्यांत बनविण्यात आली. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च आला. हाताळण्यास योग्य स्टेअरिंग, भारतातील सर्वात कमी किमतीची मोटार ठरू शकते, असे मत प्राचार्य भोसले यांनी व्यक्त केले. यश पाटील, रोहन जाधव, किरण सावंत, रोहित काताळे व प्रसाद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गाडी बनवली. 

गो-कार्ट ही देखील लक्षवेधी ठरली. दुचाकीचे इंजिन वापरून चारचाकी कार बनवली आहे. एका व्यक्तीसाठी हलक्‍या वजनाची ही कार अत्यंत माफक खर्चात बनवली आली. त्याला मागे-पुढे सस्पेंशन बसविले आहे. सौरऊर्जेवर चालणारी कार तीनचाकी आहे, तर अपंगासाठी ट्रायसिकल बनवली आहे. अपंगासाठी उत्तम हॅंडल व गिअरविना तीनचाकी सायकल बनवली आहे.

औद्योगिक क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे विद्यार्थी उद्याचे चांगले अभियंते आहेत. ज्या-ज्या ठिकाणी ‘सह्याद्री’चे विद्यार्थी जातील, त्या-त्या ठिकाणी ते क्रांती घडवतील, असा विश्‍वास आहे. - शेखर निकम,  कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था

Web Title: Ratnagiri News Sahyadri students special story

टॅग्स

संबंधित बातम्या

satana
उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...

aurangabad
64 व्या कृषी संशोधन समितीच्या बैठकीस सुरवात

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी,...

bhigwan
राष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी

भिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...

Representational Image
इम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का? (सुधीर काळे)

  पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...

उतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)

देशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...