Sections

सुरक्षिततेचे उपाय योजल्यावरच महामार्ग रुंदीकरण - आमदार संजय कदम

सिद्धेश परशेट्ये |   रविवार, 15 एप्रिल 2018

खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील दिवाणखवटीनजीक झालेल्या अपघातात शनिवारी (ता. 14) दोघांना हकनाक प्राणास मुकावे लागले. परंतु हा अपघात सर्वस्वी महामार्ग रुंदीकरणाचे काम घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे, असा आरोप आमदार संजय कदम यांनी केला.

खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील दिवाणखवटीनजीक झालेल्या अपघातात शनिवारी (ता. 14) दोघांना हकनाक प्राणास मुकावे लागले. परंतु हा अपघात सर्वस्वी महामार्ग रुंदीकरणाचे काम घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे, असा आरोप आमदार संजय कदम यांनी केला. यापुढे जोपर्यंत वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कंपनी उपाययोजना करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

घटनास्थळी भेट दिल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यावेळी अपघातग्रस्तांच्या कुटुबीयांचे सांत्वन करण्यासाठीदेखील कंपनीचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सकाळपासून त्या मृतदेहांचा पंचनामा पोलिसांना करू दिला नाही. तसेच मृतदेह ताब्यात देखील घेतले नाहीत. सकाळी साडेअकरानंतर मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी तो अपघातग्रस्त कंटेनर तसेच कल्याण इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीचे मोरवंडे-बोरज येथील कार्यालयाची तोडफोड केली. तसेच कंपनीच्या आवारातील अनेक वाहनांच्या काचा फोडल्या त्यामुळे महामार्गावरील वातावरण काहीवेळ तंग झाले होते. परंतु, पोलिसांची संयमी भूमिका व राजकीय पदाधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु यापुढे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कंपनी प्रशासनाने पावले उचलली नाहीत, तर मात्र महामार्ग रुंदीकरणाचे कामच सुरू करू देणार नाही, असा पवित्रा आमदार संजय कदम यांनी घेतला आहे.

ग्रामस्थांनी कंपनीकडून या कामाचा ठेका काढून दुसऱ्या कंपनीकडे ठेका द्यावा, अशी मागणी केली असून, यासाठी ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

Web Title: Ratnagiri News MLA Sanjay Kadam Comment

टॅग्स

संबंधित बातम्या

विजेच्या धक्‍क्‍याने सहा मच्छीमारांचा मृत्यू 

रूपोही (आसाम) : विजेचा धक्का बसून सहा मच्छीमारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. आसाममधील नागाव जिल्ह्यातील रूपोही येथे ही दुर्घटना...

तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...

बांधकाम नियमितीकरणाला मुदतवाढ 

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे...

शहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व...

ओडिशाच्या किनाऱ्याला 'दाये' वादळाची धडक 

भुवनेश्‍वर : ओडिशाच्या किनाऱ्याला आज "दाये' या चक्रीवादळाने धडक दिली. या वादळामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस पडत असून, मलकानगिरी या जिल्ह्याचा...