Sections

उत्पादन घटल्याने हापूसला सोन्याचा भाव

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 19 मार्च 2018

रत्नागिरी - उन्हाचा कडाका असला तरीही गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला वाशीसह पुणे बाजारात हापूसचा तुटवडाच आहे. उत्पादनच कमी असल्याने दरही चढेच असून पुण्यात नगाला दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत.

रत्नागिरी - उन्हाचा कडाका असला तरीही गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला वाशीसह पुणे बाजारात हापूसचा तुटवडाच आहे. उत्पादनच कमी असल्याने दरही चढेच असून पुण्यात नगाला दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत.

ऐन पाडव्यात आंब्याला सोन्याचा भाव आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला वीस हजार पेटी वाशीत दाखल झाली होती. शासकीय सुटी असल्याने अनेक बागायतदारांनी रविवारी (ता. १८) वाशीला आंबा पाठविणे पसंत केले आहे; परंतु तो मालही पन्नास टक्‍केच असेल अशी शक्‍यता आहे.

मुहूर्त साधण्यासाठी अनेक बागायतदार एकाचवेळी आंबा पाठवितात. आवक वाढली की त्याचा दरावर परिणाम होतो. - प्रसन्न पेठे, बागायतदार

साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढी पाडव्याची ओळख आहे. पंधरा वर्षांपूर्वी हाच मुहूर्त धरुन बागायतदार आंबा मुंबईच्या बाजारात पाठवित होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगामाला सुरवात होई. बागायदारांमधील वाढती स्पर्धा आणि आंबा लवकर गेला की दर चांगला मिळतो या आशेमुळे वाशीतील हापूसची आवक फेब्रुवारीतच होऊ लागली आहे. त्यात निसर्गाची चक्रेही फिरल्याने पोषक स्थिती निर्माण होत आहे. गेले काही वर्षे सुरू असलेले चक्र यावर्षी थांबले आहे. 

रविवारी सुटी असल्याने माल कमी आला आहे. सोमवारी आवक वाढेल; मात्र गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍के आवक घटली आहे. दक्षिणेकडील आंबाही कमी असल्याने त्याचा हापूसला फायदा होईल. -संजय पानसरे, वाशी

मागील पंधरा वर्षात प्रथमच पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात तयार आणि कच्च्या मालाचा तुटवडा आहे. फेब्रुवारीमध्ये माल पंचवीस टक्‍केच आंबा गेला. मार्चमध्येही गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍केच आवक झाली आहे. सुरवातीला मिळालेला पेटीचा दर आजही कायम आहे. वाशी पाठोपाठ पुण्यातही आंब्याला चांगले मार्केट मिळत आहे. सध्या पुण्यात ग्राहकांना आंब्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. डझनाला १८०० ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. चार ते सहा डझनाची पेटी ४ ते ६ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. नगाला दीडशे ते दोनशे रुपये आंबा मोजावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

 

Web Title: Ratnagiri News less production of Hapus issue

टॅग्स

संबंधित बातम्या

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

संगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार 

साडवली - पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी...

cycle.jpg
ध्यास प्रदूषण मुक्तीचा !

पुणे : पुण्यातील प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे.  पुण्यात काही तरुण सायकल चालवत प्रदूषण मुक्तीचा संदेश पुणेकरांना देत आहे. प्रदुषणमुक्त पुणे...

kalas
इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको...

Avinash Dharmadhikaris Shiv Chhatrapati Lecturement at Latur
लक्षात ठेवा, खचण्यातच खरा पराभव असतो : अविनाश धर्माधिकारी

लातूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून देदिप्यमान बुद्धीमत्ता असलेली मुलेसुद्धा खचतात. मी इतका अभ्यास केला, मला काय मिळाले ? असे म्हणतात आणि मोडून...