Sections

एलईडी मच्छिमारी नाैेकाचा थरारक पाठलाग (व्हिडिआे)

राजेश शेळके |   शुक्रवार, 27 एप्रिल 2018

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आजही एलईडी लाईट वापरून मासेमारी सर्रास केली जाते आहे. अशा पद्धतीने मासेमारी करणाऱ्या एलईडी नाैकांचा पारंपारिक मच्छिमारांच्या बोटींनी थरारक पाठलाग केला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील खोल समुद्रात हा थरारक पाठलाग झाला. हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आजही एलईडी लाईट वापरून मासेमारी सर्रास केली जाते आहे. अशा पद्धतीने मासेमारी करणाऱ्या एलईडी नाैकांचा पारंपारिक मच्छिमारांच्या बोटींनी थरारक पाठलाग केला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील खोल समुद्रात हा थरारक पाठलाग झाला. हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.

सध्या एलई़डी लाईट वापरून मासेमारीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र असे असताना सुद्धा बिनबोभाट एईडी लाईट वापरून मच्छिमारी केली जात आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छिमार विरुद्ध एलईडी लाईट वारणाऱ्या बोटीमधील संघर्ष पेटला आहे. त्यातून हा प्रकार पुढे आला आहे. पाठलाग केला जातोय त्या बोटीवर काही टनांचा जनरेटर सुद्धा आहे. या जनरेटरच्या मदतीने एईडी लाईट वापरून मासेमारी केली जाते. तर पाठलाग होत असलेल्य़ा बोटीवर एईडी लाईट सुद्धा दिसतात. या बोटीचा थरारक पाठलाग करून पारंपारिक मच्छिमारांनी समुद्रात एलईडी लाईटची बोट पकडली. 

दरम्यान बोटीवरील एलईडी लाईटची मोडतोड करण्यात आली आहे. एलईडी लाईट वापरून मच्छिमारी करणाऱ्या बोटींवरील कारवाई बाबत मत्स्यखाते उदासीन आहे, हेच यातून स्पष्ट होते. बंदीनंतर एलईडीच्या प्रकाशझोतात मासेमारी सुरु राहाते कशी त्यासाठी पारंपारिक मच्छिमारांना संघर्ष करावा लागतोय. मात्र मत्स्य खाते अजूनही झोपलंलच आहे.

Web Title: Ratnagiri News LED Fishing and traditional Fishing issue

टॅग्स

संबंधित बातम्या

सहायक पोलिस उपनिरीक्षकाने मागितली पाच लाखांची लाच

नागपूर- मत्स्य व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्‍तीला फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (...

जातीपलीकडे जाऊन तीन गावांचा एकोपा

चिपळूण - संस्कृतीचा संगम होत कोकणातील तीन गावांत सलोखा आणि एकोपा जपत लोक एकत्र नांदत आहेत. शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही रत्नागिरी जिल्ह्यातील तीन...

कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेपाच हजार कोटी

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या एकूण मार्गापैकी १४७ किलोमीटरच्या दुपदरीकरणासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाला केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे...

आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीला मज्जाव - शेंड्ये

रत्नागिरी - रत्नागिरी स्थानकात दादर पॅसेंजरमधील जागेवरून पुन्हा मंगळवारसारखा (ता. १८) गोंधळ उडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रत्नागिरीच्या...

Punes Senior Citizen decorates a village on the occasion of ganesh festival
Ganesh Festival : गणेशोत्सवानिमित्त आकाराला आले 'गोवर्धनवाडी' हे गाव

पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी...