Sections

कोकणची माती दुबईला नेऊन पिकवला हापूस

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 26 एप्रिल 2018

खेड - दुबईत हापूस आंबा पण पिकतो, ही स्वप्नवत वाटणारी किमया खरी करून दाखवली आहे खेडचे बशीरभाई हजवानी यांनी. दुबईतील त्यांनी लागवड केलेल्या झाडाला लागलेले आंबे बघायला दुबईतील अनेक लोक त्यांच्या घरी येत आहेत. 

खेड - दुबईत हापूस आंबा पण पिकतो, ही स्वप्नवत वाटणारी किमया खरी करून दाखवली आहे खेडचे बशीरभाई हजवानी यांनी. दुबईतील त्यांनी लागवड केलेल्या झाडाला लागलेले आंबे बघायला दुबईतील अनेक लोक त्यांच्या घरी येत आहेत. 

दुबई म्हणजे वाळवंटी प्रदेश. येथे फळफळावळीचे उत्पादन घेणे आव्हानात्मक होते. दुबईत हापूस पिकवायचा म्हणजे कोकणची लाल माती हवी. ती असेल तरच आंब्याचे झाड लावू शकतो. यासाठी १२ वर्षापूर्वी उधळे तालुका खेडमधून माती दुबईत आणली. सुमारे पाच फूट खोल खड्डे खोदून त्यात माती भरली. लागवडीची आवश्‍यक ती उपाययोजना केल्यानंतर हापूस आब्यांची लागवड केली. आता या झाडांना आंबे धरू लागले आहेत.

आंबे लागलेले पाहिल्यानंतर मला मी दुबईत नसून माझ्या कोकणातील उधळे गावी असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बशीरभाई हजवानी यांनी ‘सकाळ’ला दिली. आंबा झाडाबरोबरच नारळ, सीताफळ, चिकू अशाप्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यांनाही फळे ऋतुमानाप्रमाणे येत आहेत. संपूर्ण दुबईत अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे बशीर हजवानींना मनस्वी आनंद होतो. त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत व त्यांची जिद्द त्यामुळे हे शक्‍य झाले आहे. कोकणात खेडमधील त्यांच्या उधळे गावी त्यांची आंब्यांची बाग आहे. तेथे ज्या प्रकारे आंबा झाडाची काळजी घ्यावी लागते तशीच काळजी ते दुबईतील झाडांची घेतात. म्हणून हे शक्‍य झाले आहे. प्रदेश कोणताही असो, कोकणातील लाल माती असेल तर हापूस नक्की पिकवता येतो हे बशीर हजवानी यांनी दाखवून दिले आहे.

Web Title: Ratnagiri News Hapus Cultivation in Dubai

टॅग्स

संबंधित बातम्या

jail
ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीस अटक

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या...

crime
अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार

लोणी काळभोर (पुणे) : मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्याच्या बहाण्याने कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथील एका चार वर्षीय अल्पवयीन मुलावर एका...

Digambar-Shelake
सिआरपीएफ जवानाचा मृतदेह आश्वासनानंतर कुटुंबियांकडून ताब्यात

येवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी गोळी...

रो-रो सेवेचा गुजरातपर्यंत विस्तार - कोकण रेल्वे

कणकवली - कोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर गुजरातपर्यंत धावली आहे. मुंबईतील...

sharad pawar
उदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक

बारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...