Sections

चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 16 मार्च 2018

चिपळूण - चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३६६ कोटींची तरतूद केली आहे. दिघी बंदर ते रोहा या नवीन मार्गासह पेण-रोहा दुपदरीकरण आणि लोटे येथील रेल्वेच्या कारखान्यासाठी आर्थिक तरतूद झाल्याने कोकणात रेल्वे वाहतुकीला केंद्र सरकारकडून बळ मिळाले आहे.

चिपळूण - चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३६६ कोटींची तरतूद केली आहे. दिघी बंदर ते रोहा या नवीन मार्गासह पेण-रोहा दुपदरीकरण आणि लोटे येथील रेल्वेच्या कारखान्यासाठी आर्थिक तरतूद झाल्याने कोकणात रेल्वे वाहतुकीला केंद्र सरकारकडून बळ मिळाले आहे.

चिपळूण-कऱ्हाड मार्ग रद्द झाल्याच्या तसेच या प्रकल्पाचा निधी बुलेट ट्रेनसाठी वळवल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ३६६ कोटींची तरतूद केल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर नवीन प्रकल्पासह दुपदरीकरण आणि बंदरे जोडप्रकल्प रखडले आहेत. चिपळूण- कऱ्हाड, वैभववाडी-कोल्हापूर, दिघी बंदर-रोहा हे प्रकल्प मंजूर केले गेले असले तरी त्यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद मात्र केली गेली नव्हती. तत्कालीन रेल्वेमंत्री कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून नव्या प्रकल्पांना चालना मिळाली होती. मात्र प्रभू यांच्याकडील रेल्वे मंत्रिपद गेल्यानंतर कोकणातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त होत होती. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोकणच्या पदरात भरभरून दान पडले आहे.

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या चिपळूण- कऱ्हाड रेल्वे मार्गासाठी दोन वर्षापूर्वी सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेतून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला होता. मात्र, काही महिन्यांपूवी करार रद्द झाल्याने हा प्रकल्प लटकला होता. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनसाठी चिपळूण- कऱ्हाड मार्गाचा बळी दिल्याचा आरोप केला होता.

मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात या ११२ कि. मी.च्या नव्या रेल्वे मार्गासाठी १२०० कोटींपैकी ३६६ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. या रेल्वेमार्गात कऱ्हाड, चिपळूण, वेहळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही स्थानके प्रस्तावित असून ४६ किलोमीटरचे बोगदे आहेत. यामध्ये कुंभार्ली घाटात ७ कि. मी. लांबीचा बोगदा सर्वात मोठा असणार आहे.

लोटेतील रेल्वे कारखान्यासाठी ६३ कोटी खेड तालुक्‍यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विस्तारित टप्प्यातील असगणी-सात्विणगाव येथे रेल्वे डब्यांसाठीचे सुटे भाग बनवणारा कारखाना उभा राहत आहे. दीड वर्षापूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने या प्रकल्पाच्या निश्‍चितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच २९७ कोटी मंजूर रकमेपैकी या अर्थसंकल्पात ६३ कोटी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून या कारखान्यातून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे कार्पोरेशन, पश्‍चिम रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे व दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या गरजा पुरवल्या जाणार आहेत.

दिघी बंदर-रोहासाठी २५ कोटी कोकण किनारपट्टीवरील दिघी हे महत्त्वपूर्ण बंदर कोकण रेल्वेच्या रोह्यापर्यंतच्या नव्या मार्गाने जोडले जाणार आहे. दिघी बंदर-रोहा या ३३ किलोमीटर मार्गासाठी मंजूर ७२४ कोटींपैकी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे; तर पेण-रोहा या ४० किलोमीटरच्या दुपदरीकरणासाठी तीन कोटी देण्यात आले आहेत.

Web Title: Ratnagiri News Chiplun-Karad Railway issue

टॅग्स

संबंधित बातम्या

पर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच

पुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

बेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस 

मुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...

पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...

शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...

ullhasnagar.jpg
 उल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण

उल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...