Sections

लांजा, राजापुरात दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड

राजेश कळंबटे |   शुक्रवार, 23 मार्च 2018

रत्नागिरी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (नरेगा) राजापूर, लांजा तालुक्‍यांत दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड केली जाणार आहे

रत्नागिरी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (नरेगा) राजापूर, लांजा तालुक्‍यांत दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड केली जाणार आहे. समूह शेतीतून (क्‍लस्टर फार्मिंग) बांबू लागवडीचा कोकणातील हा पहिला प्रयोग असल्याचे उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना कार्यालयामार्फत रत्नागिरीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक श्री. धुमाळे यांनी मार्गदर्शन केले. लागवड, रोपांची निवड, मार्केटिंग, काळजी कशी घ्यावयाची याची माहिती यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आली.

नरेगा योजनेतून आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्याच धर्तीवर बांबू लागवड करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागाकडून घेण्यात आला. त्यासाठी लांजा, राजापूर येथील शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली होती. मुंबईमध्ये बांबूला मोठी मागणी असते. तसेच फर्निचर, अगरबत्ती व्यवसाय आणि कन्स्ट्रक्‍शनसाठी बांबूचा वापर अधिक केला जातो. त्याला पूरक अशा जातींच्या बांबूची लागवड केली तर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकतो.

कोकणात व्यावसायिक स्तरावर याकडे पाहिले जात नाही. क्वचित ठिकाणी शेतावर किंवा वहाळाच्या शेजारी बांबूची बेटं पाहायला मिळतात. कोकणातील जमिनीत चांगल्या प्रकारचा बांबू होऊ शकतो. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी रोपं बेंगलोर येथून आणण्यात येणार आहेत. बाल्कोबा, न्यूटल्स, ट्रिप्टस्‌ या जाती प्रसिद्ध आहेत. एका हेक्‍टरला चारशे बांबूची रोपे लावली जातात.

उत्पादकता वाढविण्यासाठी रोपांना ठिबक सिंचन (ड्रीप) योजनेचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि लीड बॅंकेकडून यासाठी शंभर टक्‍के कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. लागवडीबरोबरच त्यातून निर्माण होणाऱ्या अन्य व्यावसायांचेही मार्गदर्शन तेथील तरुणांना देण्यात येणार आहे. बांबूपासून तयार केलेल्या फर्निचरला शहरांमध्ये मागणी आहे. ती कशी तयार करायची याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बांबू मिशनची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

निधी वाढविण्यासाठी प्रयत्न

रोपे खरेदी, खड्डे खोदणे, खते देणे यासाठी नरेगा योजनेतून बांबूसाठी हेक्‍टरी सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत. आंबा, काजूप्रमाणे बांबूला एक लाख 20 हजार रुपये हेक्‍टरी मिळवून देण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू आहेत. वाढीव निधी मिळाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी याकडे वळतील. 

Web Title: Ratnagiri News Bamboo planting on 200 hecters in Lanja, Rajapur

टॅग्स

संबंधित बातम्या

manohar parrikar
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम

नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...

Akhilesh Yadav Demands JPC Probe Into Rafale Deal, Says Issue Has Now Become Global
राफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...

PM Modi Launches Mega Health Scheme Aimed At 50 Crore Indians
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच

रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...

बारामती शहरात पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक

बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली....

Dhule
धुळ्यात लोकसहभातून बसविले 32 सीसीटीव्ही कॅमेरे 

धुळे : विधायक कार्यासाठी साडेतीनशे तरुण संघटित झाले आणि त्यांनी वंदे मातरम प्रतिष्ठानची धुळे शहरात स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव...