Sections

मिरकरवाडा बंदरातील दीड लाख क्युबिक मीटर गाळाचा उपसा

राजेश कळंबटे |   रविवार, 18 मार्च 2018

रत्नागिरी - मिरकरवाडा बंदर टप्पा 2 मध्ये गाळ आणि संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. आत्तापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. दुसरा टप्पा काम पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

रत्नागिरी - मिरकरवाडा बंदर टप्पा 2 मध्ये गाळ आणि संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. आत्तापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. दुसरा टप्पा काम पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

मिरकरवाडा टप्पा 2 मधून बंदरात येणारा गाळ कायमस्वरुपी काढतानाच मच्छीमारांना लागणार्‍या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सुरवातीला मशिदीजवळील संरक्षक भिंतीची लांबी दीडशे मीटरने वाढविणे आणि पांढरा समुद्र येथे 525 मीटरची भिंत बांधण्याचे काम हाती घेतले. समद्रातून येणारा गाळ बंदरात शिरू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. या भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पांढरा समुद्राजवळील भिंतीस शेवटचा आकार देण्याचे काम सुरु आहे. या भिंतीवर सुमारे 52 कोटी खर्च झाले आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2018 पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे;

स्लोपिंग हार्ट (नौका दुरुस्तीसाठी रॅम्प) उभारणे, अंतर्गत रस्ते, निवारा शेड, उपाहारगृह, साहित्य ठेवण्याची शेडस्, लिलावगृह, शौचालये, यासह चार जेट्यांची दुरुस्तीच्या कामांना सुरवात झालेली नाही. बंदरात उभ्या केलेल्या नादुरुस्त नौका काढून नेण्यासाठी मच्छीमार सोसायटीने मत्स्य विभागाला पत्र दिले आहे. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही.

फ्लोटिंग ड्रेझरद्वारे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत दीड लाख क्युबिक मीटर गाळ काढून झाला आहे. बुधवार, शुक्रवार नौका बंदरातच उभ्या असल्याने ड्रेझर बंद राहतो. उर्वरित पाच दिवस गाळ काढला जातो. पहिल्या दोन जेटीतील गाळ काढून झाला असून शेवटच्या दोन जेट्यांमधील गाळ काढायचे काम सुरु करावयाचे आहे.

एका जेटीत  जुन्या नौका ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या काढण्यावरुन मच्छीमार आणि प्रशासन आमनेसामने आलेले आहे. मच्छीमार सोसायटीने त्या नौका काढाव्यात असे पत्र दिले आहे. पण मत्स्य विभागाकडून एमएमबी आणि कंत्राटदाराला पत्र गेले नसल्याने काम थांबले आहे.

सर्व्हेक्षणानुसार अडीच लाख क्युबिक मीटर गाळ काढावयाचा होता. अजून एक लाख क्युबिक मीटर गाळ काढावा लागणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलावी लागणार आहेत.

बंदरातील नादुरुस्त मच्छिमारी नोका काढण्यासाठी सोसायटीकडून पत्र दिले आहे. त्याची अमलबजावणी केली जात नाही. - सुलेमान मुल्ला, मच्छिमार

Web Title: Ratnagiri News 150,000 cubic meters of puddle in Mirarkwara port

टॅग्स

संबंधित बातम्या

शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश

मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...

muktapeeth
प्राजक्त मैत्री

प्राजक्ताचे फूल म्हणजे विरक्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला. झाड बहराला आल्यावर दारासमोर पारिजातकाचा सडा...

घारापुरी बेटावर रोज रात्री जाळला जातोय कचरा

नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईतील समुद्रात अगदी मध्यभागी वसलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या...

boardi
बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे केले लक्ष केंद्रित

बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे...

Sea-Lane
मलबार हिल ते वरळीपर्यंत सहा किमीचा सागरी पदपथ

मुंबई - वरळी सी फेसमधील ८३ वर्षे जुना आणि दोन किलोमीटर लांबीचा पदपथ किनारी मार्गाच्या कामात इतिहासजमा होणार आहे. मलबार हिलमधील प्रियदर्शनी पार्क ते...

हवामानाचा अंदाज मोबाईलवर !

पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...