Sections

मुख्यमंत्र्याना स्वस्थ बसू देणार नाही : खासदार राऊत

राजेश कळंबटे |   शनिवार, 14 एप्रिल 2018
For Nanar refinery Project Shivsena MP Vinayak Raut

सौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आता अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून शिवसेना 'वर्षा'वर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारने सौदी अरेबीयाशी केलेल्या करारामुळे शिवसेना सध्या चांगलीच खवळली आहे. त्यामुळे शिवसेनेची हि नाराजी आत थेट वर्षापर्यत धडकणार आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला येेथील स्थानिक जनतेचा पहिल्यापासून तीव्र विरोध आहे. मात्र, हा विरोेध डावलून सध्या हा प्रकल्प रेटण्याच्या तयारीत सरकार आहे. शिवसेना देखील सुरवातीपासून या प्रकल्पाच्या विरोधात आहे. सौदी अरेबियाशी झालेल्या करारानंतर तर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. वर्षावर मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार असे म्हणत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी  शिवसेना आमदारांना घेऊन आपण वर्षा बंगल्यावर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे..

तसेच आमदार राजन साळवी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारची दडपशाही असून हा प्रकल्प लादण्यासाठी मुख्यमंत्री किती उत्सुक झालेले आहेत, हे यावरून दिसत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच प्रशासनाच्या मदतीनेच येथील जमीन खरेदीविक्रीचे व्यवहार चालत आहेत आणि गुजरातहून जमीन खरेदीसाठी भूमाफियांची टोळधाड आलेली आहे, ती शासनाच्या आशीर्वादामुळेच आली असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: For Nanar refinery Project Shivsena MP Vinayak Raut

टॅग्स

संबंधित बातम्या

Petrol price regularly hike
देशभरात पेट्रोलची दरवाढ सुरूच 

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला....

shriram pawar
हिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)

भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...

devidas tuljapurkar
एकीचे बळ... मिळेल फळ? (देविदास तुळजापूरकर)

विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...

पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द 

सोलापूर : तीन क्विंटल लाकूड किंवा ट्रकचे तीन मोठे टायर जाळून त्यात मूठ मूठभर पन्नास किलो मीठ टाकल्यास हवेत पांढरा धूर तयार होतो. त्यातून...

मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा : गिरीश बापट 

पुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता...