Sections

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केला 'बाल कविता संग्रह'

अमित गवळे |   बुधवार, 7 मार्च 2018
school

या कविता संग्रहाचे नाव "काव्यपुष्प बालमनांचे" असून यात शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी रचलेल्या पन्नास कविता आहेत. या काव्य संग्रहाच्या प्रकाशिका शाळेच्या शिक्षिका चित्ररेखा जाधव या आहेत. मुलांनी तयार केलेला आणि प्रकाशित झालेला जि.प शाळेतला हा पहिलाच संग्रह असल्याचे बोलले जात आहे.

पाली : मुलांच्या उपजत प्रतिभा आणि कल्पना शक्तिला मोकळे आकाश देण्याचे काम पेण तालुक्यातील राजिप शाळा, आमटेम ने केले आहे. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वरचित कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन आणि ई प्रकाशन डायट पनवेल प्राचार्य सुभाष महाजन आणि डायट टिम यांच्या मार्फत करण्यात आले.

या कविता संग्रहाचे नाव "काव्यपुष्प बालमनांचे" असून यात शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी रचलेल्या पन्नास कविता आहेत. या काव्य संग्रहाच्या प्रकाशिका शाळेच्या शिक्षिका चित्ररेखा जाधव या आहेत. मुलांनी तयार केलेला आणि प्रकाशित झालेला जि.प शाळेतला हा पहिलाच संग्रह असल्याचे बोलले जात आहे. डायट प्राचार्य सुभाष महाजन यांच्यासह डायट टिमचे रोहन पाटील, शिंदे सर, वायाळ सर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन आणि ई प्रकाशन झाले. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे कवितांचे सादरिकरण केले आणि उपस्तितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि शाळेचे गुणवत्तापुर्ण उपक्रम यांचे सादरीकरण केले गेले. सुभाष महाजन यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी शिक्षकवृंद यांच्या कामाचे कौतुक केले. मराठी भाषा जतन संवर्धन यासाठी आम्ही सदैव कटीबध्द असल्याची ग्वाही शाळेच्या मुख्याध्यापिका यशोदा पाटील आणि शिक्षकांनी दिली.

या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास डायट प्राचार्य सुभाष महाजन यांच्यासह डायट टिमचे रोहन पाटील, शिंदे सर, वायाळ सर तसेच राजिप शाळा, आमटेमच्या मुख्याध्यापिका यशोदा पाटील, शिक्षिका व काव्य संग्रहाच्या संपादिका चित्ररेखा र. जाधव, ल.स पाटील, सुचिता पाटील, हर्षदा दारकुंडे, राजश्री पेरवी, हिरामण दैरे, रुपाली मोकल हे शिक्षकवृंद तसेच भुमिका पाटील जय मोकल हे विद्यार्थी प्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते.

Web Title: Marathi news Raigad news zp school poem

टॅग्स

संबंधित बातम्या

muktapeeth
प्राजक्त मैत्री

प्राजक्ताचे फूल म्हणजे विरक्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला. झाड बहराला आल्यावर दारासमोर पारिजातकाचा सडा...

vishnu manohar
खाद्यसंस्कृती गोव्याची (विष्णू मनोहर)

गोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गोव्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ...

sanjay kalamkar
साधाभोळा कलास्वाद...रस्त्यावरचा! (संजय कळमकर)

कला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य! "प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...

book review
आंतरआवाजाचा शोध घेणारी मुक्त स्वगतं (संतोष शेणई)

संदीप खरे यांचा "मी अन्‌ माझा आवाज..." हा कवितासंग्रह मी वाचतो आहे. खरे यांच्याकडून त्यांच्या कविता मी ऐकल्या आहेत. समूहात बसून कविता ऐकणं आणि एकटं...

"पु.ल.', "गदिमा', "बाबुजीं'सारख्यांमुळे महाराष्ट्र मोठा : ना. धों. महानोर 

जळगाव : एखाद्या गावाची, राज्याची ओळख, उंची ही ते किती मोठे आहे, किती समृद्ध आहे, यापेक्षा त्याठिकाणी किती प्रतिभावंत कवी, साहित्यिक, कलावंत आहेत,...

उमरेड - विद्यार्थ्यांना काव्यनिर्मितीचे धडे देताना मुख्याध्यापक एकनाथ पवार.
अख्ख्या वर्गाला लागलंय कवितेचं 'याड'

उमरेड - मराठी साहित्य संमेलनाचा विषय सदया फार चर्चेचा आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कवितेकडे वळण्यासाठी किती प्रयत्न होत आहेत, यावर प्रश्‍नचिन्ह...