Sections

नगरपरिषदेची प्लास्टिक विरोधात कारवाई

सुनिल पाटकर |   गुरुवार, 10 मे 2018
mahad corporation against plastic use

राज्य सरकारच्या आदेशाला प्रतिसाद देत महाड नगरपरिषदेने प्लास्टिक पिशव्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार गेल्या दोन दिवसांत शहरातील सुमारे पन्नासहून अधिक दुकानदारांनी सोळा किलो प्लास्टिक पिशव्या नगरपरिषदेच्या भरारी पथकाकडे जमा केल्या. नगरपरिषदेच्या या प्लास्टिक विरोधी मोहीमेचे शहरातील पर्यावरण प्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

महाड - राज्य सरकारच्या आदेशाला प्रतिसाद देत महाड नगरपरिषदेने प्लास्टिक पिशव्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार गेल्या दोन दिवसांत शहरातील सुमारे पन्नासहून अधिक दुकानदारांनी सोळा किलो प्लास्टिक पिशव्या नगरपरिषदेच्या भरारी पथकाकडे जमा केल्या. नगरपरिषदेच्या या प्लास्टिक विरोधी मोहीमेचे शहरातील पर्यावरण प्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्या तसेच थर्माकोल विक्री करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आलेले असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपरिषदेकडून भरारी पथक तैनात करण्यात आलेले आहे. महिनाभरापासून महाड नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशव्या वापराविरोधात शहरात दवंडी देण्यात येत आहे. तर प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांचा साठा ज्या दुकानदांकडे आढळून येईल अशा दुकानदारांनी साठा नगरपरिषदेकडे जमा करून दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन नगरपरिषदेकडून केले जात आहे. प्लास्टिक पिशव्या पहिल्यांदा सापडल्यास पाच हजार रु दंड, दुसऱ्यांदा प्लास्टिक पिशव्या सापडल्यास दहा हजार रु दंड तर तिस-या वेळेस ज्या दुकानदाराकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास पन्नास हजार रु. दंड अथवा तुरूंगवासाची शिक्षेची तरतूद देखील या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे.

 

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागाचे अभियंता अविनाश भोईर, आरोग्य निरीक्षक किशोर शिंदे आदी कर्मचारी या प्लास्टिक पिशव्या विरोधात भरारी पथकाची शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Web Title: mahad muncipal corporation against plastic use

टॅग्स

संबंधित बातम्या

Dengue
बीड : कोळवाडीत डेंगीचे पन्नास रूग्ण

शिरूर कासार, जि. बीड : शिरूर कासार जवळील येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आज मितीला कोळवाडीमधील सुमारे चाळीस ते पन्नास रूग्नावर वेगवेगळ्या...

Akola
अन् एसटी बस पोहचली आरोग्य केंद्रात

किनगावराजा (जिल्हा बुलडाणा) : जागतिक पर्यटनस्थळ असलेले लोणार येथे येण्यासाठी निघालेली बस लोणारकडे न जाता आरोग्य केंद्राकडे वळते... असा काही प्रसंग...

marathon
9 डिसेंबरची धावाधाव कुटुंबासाठी!

पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनला पुणेच नव्हे तर राज्यभरातून लक्षवेधी प्रतिसाद मिळू लागला आहे. सहकुटुंब सहपरिवार धावण्यासाठी आणि...

मधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर 

पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित...

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...