Sections

जिल्ह्यातील संगणक परिचालक देणार सामूहिक राजीनामे 

सुनील पाटकर |   रविवार, 6 मे 2018
Computer operators in the district are going to give a collective resignation

संगणक परिचालकांच्या न्याय व हक्कांसाठी आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळावा या साठी CSC-SPV कंपनीच्या विरोधात 9 एप्रिल पासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

महाड - महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्रातर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्या न्याय व हक्कांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक 11 मे ला जिल्हापरिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच त्याच दिवशी शासन आणि कंपनीचा निषेध म्हणून सामूहिक राजीनामे देणार आहेत. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे (महाड) यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र सरकारला यावर्षीचा पंचायत राज पुरस्कार मिळवून देण्यात संगणक परिचालकांनी महत्वाचे काम केलेले आहे. संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये नेट कनेक्शन नसताना सायबर मध्ये स्वखर्चाने जाऊन तसेच उशिरा थांबून ग्रामपंचायतीची कामे पूर्ण केलेली आहेत त्याचसोबत जे काम शिपाई आणि लिपिकाचे आहे ती देखील कामे संगणक परिचालक करत आहेत. परंतु संगणक परिचालकांच्या न्याय व हक्कांसाठी आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळावा या साठी CSC-SPV कंपनीच्या विरोधात 9 एप्रिल पासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मानधन वेळेत न मिळाल्यास आंदोलन करण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन देऊनही त्याची दखल प्रशासनाने न घेतल्याने तसेच CSC-SPV कंपनीच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या शासनाचा निषेध म्हणून रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने 11 मे ला रायगड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन आणि त्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक सामुहिक राजीनामे देणार आहेत .

जोपर्यंत आमचे आज पर्यंत चे सर्व थकीत मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदे समोरून संगणक परिचालक उठणार नाहीत, असा इशारा मयूर कांबळे यांनी दिला आहे. फेब्रुवारी 2017 ते मार्च 2018 थकित मानधन मिळावे, काही संगणकचालकांचे फेब्रुवारी 2017 ते डिसेंबर 2017 चे मानधन कपात केले आहे ते मिळावे, आरटीजीएस मध्ये अडकलेले मानधन मिळावे, अशा अनेक मागण्या संगणक परिचालकांनी केल्या आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Computer operators in the district are going to give a collective resignation

टॅग्स

संबंधित बातम्या

MES
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ही नामांकित संस्था 19 नोव्हेंबरला 159व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने 24 नोव्हेंबर (...

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

mbl-ban
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक डिसेंबरपासून मोबाईल बंदी

चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा...