Sections

गणपती इलो, चला गावाक!

प्रकाश पाटील |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत केले. 

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत केले. 

सौ. राणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, आम्ही कोकणातीलच. कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रिक्षातून गावी येण्याचे ठरवले. मुंबई-मालवण सुमारे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करत असताना महामार्गातील खड्ड्यांनी रिक्षा चालवणे नकोसे वाटले. बरोबर पती आणि मुलगीला घेऊन यापूर्वी टॅक्‍सी घेऊन येत होते. पण यंदा रिक्षाने गावी आले. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, आनंद आहे, पण खड्ड्यांचे काय? महामार्गावर अंतराअंतरावर स्वच्छतागृह हवीत. त्याची मोठी उणीव जाणवते. पेट्रोल, डिझेल दरात वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने संसार चालवणे मेटाकुटीला आले आहे. रिक्षा हा श्‍वास आणि ध्यास आहे, पण इंधन दरवाढीमुळे जीवनात राम उरला नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. नोकरी नाही म्हणून कोणी गप्प न बसता हिमतीने महिलांनी बाहेर पडले पाहिजे. मिळेल ते काम केल्यास जगाच्या बाजारात महिलेचे अस्तित्व नक्कीच समजेल.

 

Web Title: for Ganesh Festival Vijaya Rane travel Mumbai to Malvan with auto

टॅग्स

संबंधित बातम्या

कुंडलच्या महाराष्ट्र मैदानात खत्री विजयी

कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही...

चिपळूण तालुक्यात आरामबस जळून खाक

सावर्डे - मुंबई - गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस (एमएच.03-सीपी-1472) चिपळूण तालुक्यातील आगवे गावच्या हद्दीत अचानक आग...

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...

School
शिक्षकांअभावी वर्ष धोक्‍यात

आपटी - शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने झाले तरी पन्हाळा तालुक्‍यात ५६ शिक्षक, २८ पदवीधर शिक्षक, १८ मुख्याध्यापक, ११ केंद्रप्रमुख अशी तब्बल...

‘एकला चलो रे’ म्हणत तो खड्डे बुजवतोय

तासगाव - तासगाव ते जरंडी पत्रा या राज्यमार्गावरील सावर्डे फाटा ते कौलगे या रस्त्याचा भाग इतका खराब झाला आहे, की या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही मुश्‍...

यकृत दानाने वाचविले पित्याचे प्राण

सावर्डे - वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने वडिलांसाठी यकृताचा काही भाग आपल्या वडिलांना दान देवून जीवदान दिले. जूनमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली....