Sections

आरोग्यसेविकेचा मुलगा बनला राज्याचा आरोग्य संचालक

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
डॉ. संजीव कांबळे

अकरा पुस्तकांचे लेखक 
आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे आरोग्य विभागात सेवा देत असताना जनतेला आरोग्यदायी शिकवण देण्यासाठी अकरा पुस्तके लिहिली आहेत. हिवताप, क्षयरोग अशा विविध विषयांवर पुस्तक लिहून ती गावखेड्यापासून तर दुर्गम भागात तसेच शहरात मोफत वितरित केले. विशेष असे की, त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यकाळ जवळ आला आहे. त्यामुळे महिन्या दोन  महिन्यांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती आहे. डॉ. कांबळे यांनी क्षयरोग नियंत्रणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी युनिव्हर्सल ॲक्‍सेस टू ट्यूबरोक्‍युलोसिस केअर या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाला डॉ. कांबळे यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली. खासगीत उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना मोफत उपचाराची सोय देणारा हा देशातला पहिला पथदर्शी प्रकल्प आहे, हे विशेष.

नागपूर - ही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खूप काही सांगून जाणारी. आरोग्य विभागात चतुर्थश्रेणीतील आरोग्य सेविकेच्या पदावर काम करणाऱ्या मातेच्या एका मुलाने त्याच विभागातील सर्वोच्च अशा आरोग्य संचालकपदावर झेप घेतली. गुरुवार (ता. ६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच त्यांची नियुक्ती झाल्याचा निकाल घोषित केला. नाव डॉ. संजीव वामनराव कांबळे. मूळचे नागपूरचे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य संचालक म्हणून डॉ. कांबळे दोन दिवसांनंतर रुजू होतील. त्यांच्या निवडीने समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. 

डॉ. संजीव वामनराव कांबळे यांच्या आईचे नाव प्रभा कांबळे. ते दिवस गरिबीचे होते. संसाराचा गाडा ओढताना होणारा त्रास लक्षात घेता शिक्षण होईल, हे सांगता येत नव्हते. परंतु, आईचे शब्द काळजावर कोरलेले. ‘लेकरा सायेब बन, बाबासाहेबांसारखा मोठा माणूस हो....’या आईच्या शिकवणीतून मोठा झाल्याचे सांगत आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा ठेवा आज ठरला आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया. अनेकांना प्रेरणा देणारा हा क्षण असला तर मातेने केलेला संघर्ष आजही डॉ. कांबळे आठवतात. मिळेल ते काम केलं, ते सगळे कष्ट आज फळाला आले. 

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी पास झाल्यानंतर डॉ. कांबळे मेडिकलमध्येच अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत  पास झाल्यानंतर आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी मिळाली. पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक, सहसंचालक पदावर काम केले. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण त्यांना मिळाले आणि राज्याच्या आरोग्य संचालकपदावर त्यांची नियुक्ती झाली. नागपूर, ठाणे, नाशिक असे राज्यभरात त्यांनी काम केले हे विशेष. 

Web Title: nagpur vidarbha news dr. sanjiv kambale state health director

टॅग्स

संबंधित बातम्या

live photo
मनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न 

जळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...

समान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे? 

जळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...

cholesterol
कोलेस्टेरॉल

कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता...

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती

मंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

saswad.jpg
सरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)

सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...

नाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण

खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...