Sections

स्थानकांवरील भिकाऱ्यांचे 'तो' दाढीसह केसही कापतो

अक्षय गायकवाड |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
ravindra birari

विक्रोळी (मुंबई): रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेने पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी आणि शरीराचा कुबट वास हे पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही करत नाही. परंतु, ते ही समाजाचा एक भाग आहेत, त्यांनीही नीटनेटके दिसावे, त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने रवींद्र बिरारी हा अवलिया पुढे आला. त्यांनी कोणतीही लाज न बाळगता अशा नाकारलेल्या घटकांचे केस कापणे आणि दाढी करण्याचा विडा उचलला आहे. बिरारी यांचे भांडूप येथे केसकर्तनालय आहे.

विक्रोळी (मुंबई): रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेने पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी आणि शरीराचा कुबट वास हे पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही करत नाही. परंतु, ते ही समाजाचा एक भाग आहेत, त्यांनीही नीटनेटके दिसावे, त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने रवींद्र बिरारी हा अवलिया पुढे आला. त्यांनी कोणतीही लाज न बाळगता अशा नाकारलेल्या घटकांचे केस कापणे आणि दाढी करण्याचा विडा उचलला आहे. बिरारी यांचे भांडूप येथे केसकर्तनालय आहे.

टिटवाळा येथे राहत असलेले 34 वर्षीय बिरारी हे आठवड्यातून 1 दिवस नाकारलेल्या घटकांसाठी देतात. केस व दाढी करण्याचे साहित्य घेऊन टिटवाळा ते भांडूप या प्रवासात विविध स्थानकांवर असणाऱ्या भिकारी, मनोरुग्ण व्यक्तीनं शोधून त्यांचे केस कापतात. आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारच्या 500 जणांचे केस मोफत कापले आणि दाढी केली आहे.

समाजातील दुर्लक्षित घटकासाठी काही तरी करायचे आहे. पण माझ्या खिशात पैसे नाहीत. तेव्हा पैशांशिवायही आपल्या हातात असलेलेल्या कलेने आपण समाजसेवा करू शकतो हे ओळखत बिरारी यांनी समाजसेवेचा नवा वसा घेतला आहे. काही वेळा या व्यक्ती यांचे ऐकत नाहीत. पण त्यांच्याशी गोड बोलून किंवा त्यांना खाण्यासाठी काही देऊन ते केस कापतात. एकदा बिरारी यांना एका मनोरुग्णाने कानाखाली मारली होती.

अनेकदा भिकाऱ्यांचा विश्वास संपादन करायला वेळ लागतो. नाकारलेपणाची भावना तीव्र असल्याने त्यांना मायेचा ओलावा वा मदत सहन होत नाही, त्यांना विश्वासात घेऊनच केस कापावे लागतात, असे बिरारी यांनी सांगितले.

फलाटावर केस कापताना रेल्वे पोलिसांनी त्यांना एकदा पडकले होते. त्यांचा हेतू समजवताच त्याना सोडण्यात आले, असा अनुभव आल्याचे रवी यांनी सांगितले. बिरारी यांचा केश कर्तनालयाचा भांडूप दातार कॉलनी येथे व्यवसाय आहे.

Web Title: mumbai news vikroli barber hair ravindra birari

टॅग्स

संबंधित बातम्या

Punes Senior Citizen decorates a village on the occasion of ganesh festival
Ganesh Festival : गणेशोत्सवानिमित्त आकाराला आले 'गोवर्धनवाडी' हे गाव

पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी...

Shrikrishna-Harane
नोकरी गमावली; पण रेशीम शेतीतून पत कमावली

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी...

Sakal-Exclusive
देहव्यापारासाठी मुंबई-पुण्यातील युवतींना पसंती

नागपूर - स्थानिक पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षित धोरणामुळे शहरात सध्या देहव्यापार धडाक्‍यात सुरू आहे. शहरातील अनेक...

मोपेड मोटारसायकलने प्रवास करताना बीएजी ग्रुपच्या सदस्य.
नारी शक्तीचा अनोखा प्रवास

नागपूर - महिलांनी तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करायचा, तोही चक्क मोपेडने. असे अनोखे वेड घेऊन निघालेल्या भटकंती आत्मा ग्रुपच्या (बीएजी) पाच...

Human-Trafficking
बेडिया, कंजर जमातीतील मुलींची सर्वाधिक विक्री

नागपूर - मानवी तस्करी ही जगभरातील मोठी समस्या असून सुसंस्कृत समाजाला लागलेला हा कलंक होय. महिला आणि मुलांना या तस्करीच्या जाळ्यात अडकवतात. या...