Sections

शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीला रेशीम धागा

भीष्माचार्य ढवण |   शुक्रवार, 16 मार्च 2018
काळेगाव (ता. बार्शी) - येथील सुवर्णा व शंकर घायतिडक यांचा यशस्वी पहिला रेशीम उद्योग.

सासुरे - बार्शी रोडवरील काळेगाव (ता. बार्शी) सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आणि गावाचा कायापालट झाला. गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत उद्योगाची जोड मिळत आहे. सध्या, गावात एकूण 25 शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाले आहेत. त्यामुळे पुढील काळात काळेगावची ओळख "रेशमी काळेगाव' म्हणून होणार आहे.

सासुरे - बार्शी रोडवरील काळेगाव (ता. बार्शी) सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आणि गावाचा कायापालट झाला. गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत उद्योगाची जोड मिळत आहे. सध्या, गावात एकूण 25 शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाले आहेत. त्यामुळे पुढील काळात काळेगावची ओळख "रेशमी काळेगाव' म्हणून होणार आहे.

सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने शासनाच्या योजना समजून घेऊन त्याचा योग्य लाभ घेतल्यास शेती कशी फायदेशीर होऊ शकते, हे प्रात्यक्षिकरीत्या दाखवून दिले. याविषयीही मार्गदर्शन केले. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना वाई, पाचगणी, भाळवणी याठिकाणच्या रेशीम उद्योगांची प्रत्यक्ष भेटीमार्फत माहिती दिली.

आज या गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत जोडधंद्याची जोड मिळत आहे. शेतीला वेगळा पर्याय म्हणून काळेगावचे शेतकरी रेशीम उद्योगात रमले आहेत. यासाठी गावातील एकूण 25 शेतकऱ्यांनी यासाठी स्वतंत्र गट निर्माण करून रेशीम उद्योगासाठी कंबर कसली आहे. यातील अवघ्या नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अल्पभूधारक शेतकरी शंकर व सुवर्णा घायतिडक या पती-पत्नींनी गावातील पहिला रेशीम उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांनी मनरेगा योजनेअंतर्गत स्वतःचे 50 बाय 60 आकाराचे शेड बनवून त्यामध्ये 60 हजार कोष कीटक जोपासले आहेत. यासाठी एक एकर क्षेत्रावर व्ही -1 या तुती वृक्षांची लागवड पाच बाय दोनप्रमाणे पट्टा पद्धतीने केली. यासाठी त्यांनी खर्चात बचत करणारी फांदी पद्धत निवडली आहे. अंडी कुंज लाभल्यापासून फक्त एकाच महिन्यात त्यांची पहिली कोष बॅच यशस्वीरीत्या हाती आली. वर्षातून एकूण चार बॅच बाहेर पडल्यास त्यांना एकूण सुमारे अडीच लाखांचे उत्पादन मिळू शकते.

रेशीम उद्योगाकडे वळलेत 25 शेतकरी ... दीपक घायतिडक, संजय घायतिडक, अण्णासाहेब घायतिडक, सतीश घायतिडक, दशरथ घायतिडक, शिवाजी गिलबिले, शामल घायतिडक, उद्धव घायतिडक, पांडुरंग घायतिडक, शिवाजी घायतिडक, श्रीधर देशमुख, सुनील घायतिडक, भारत घायतिडक, दादा देशमुख, संतोष घायतिडक, प्रकाश देशमुख, लालासाहेब घायतिडक, लहू काळे, अशोक घायतिडक, पांडुरंग देशमुख, दादा मस्तूद, प्रभू काळे, शंकर घायतिडक .

रेशीम कोषला बाजारपेठ कोठे? तयार झालेल्या कोषाला रामनगर (कर्नाटक) येथे प्रतिकिलो 500 ते 720 रुपयांप्रमाणे दर मिळतो.

अनुदान कोठून, कसे व किती मिळते? शासनाच्या मनरेगा योजनेतर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने 2 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान मिळते. यासाठी आवश्‍यक कागदपत्रके तहसील कार्यालय व रेशीम कार्यालय सोलापूर यांच्याकडे जमा करावीत.

Web Title: marathi news sasure news farmer silk business motivation

टॅग्स

संबंधित बातम्या

Stone-Crusher
दगड फोडून पोट भरणारं गाव

मरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या...

लेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित

कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...

nanded
नांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत 

नांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...

bhushansinha-holkar
धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल - युवराज भुषणसिंह होळकर 

मोहोळ (सोलापूर) - धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच, पण त्याबरोबर समाजबांधवांची  शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती...

bulbul
आढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल 

सोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव...

Solapur
पहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम 

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....