Sections

शेतमजूर युवक बनला जमीनदार!

हेमंत पवार |   शनिवार, 21 एप्रिल 2018
दक्षिण तांबवे - शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर अनिल बाबर यांनी शेळी प्रकल्पही यशस्वी केला आहे.

कऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथील अनिल हिंदुराव बाबर हा युवक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ते करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानी पै- पै साठवून वडिलार्जीत जमीन वहिवाटीखाली आणत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पिके फुलवण्याची किमया साधली आहे.

कऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथील अनिल हिंदुराव बाबर हा युवक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ते करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानी पै- पै साठवून वडिलार्जीत जमीन वहिवाटीखाली आणत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध पिके फुलवण्याची किमया साधली आहे.

अनिल यांनी मजुरीतून मिळालेले पैसे साठवून त्यानी पहिल्यांदा वडिलार्जीत डोंगराकडेला असलेली जमीन सुस्थितीत आणून तेथे पीक घेण्यास सुरवात केली. त्यात रोजगार हमी योजनेतून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे विहिरेचे काम केले. त्या विहिरीला चांगले पाणी लागल्याने जमिनीची पाण्याची गरज भागू लागल्यामुळे मोठी चिंता मिटली. कृषी विभागाच्या सहकार्यातून ठिबक सिंचनाद्वारे भाजीपाला, उसासह अन्य पिके घेण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांना आई शोभाताई, भाऊ सुनील, चुलते दिनकर बाबर व कुटुंबीयांची साथ मिळत आहे. पुढे अनिल यांनी शेळी पालन करण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे शंभरहून अधिक शेळ्या आहेत. कृषी विभागाच्या प्रवीण सरवदे यांनी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, मंडल कृषी अधिकारी सुनील ताकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बाबर याना ५३ हजार रुपयांचे गांडूळ खत युनीट, बांधावर नारळ लागवड, यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टिलरसाठी ७५ हजार अनुदान दिले. त्या माध्यमातून अनिल यांनी शेतीमध्ये भरारी घेत स्वतः जमीनदार होण्याचे स्वप्न अवघ्या सात ते आठ वर्षांतच सत्यात उतरले आहे.

कष्ट केले तर सोन्याचा घासही खायला मिळतो हे मी स्वतः अनुभवत आहे. तरुणांनी शेती करायची लाज बाळगू नये. नोकरीच्या मागे न धावता वडिलार्जीत शेती करून कुटुंब सुखी ठेवावे.  - अनिल बाबर, युवा शेतकरी

Web Title: farm worker anil babar Landlord success motivation

टॅग्स

संबंधित बातम्या

कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....

"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले  

मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार 

मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...