Sections

खिळे... मोळे... पंक्‍चर आणि सामाजिक जाण...

निखिल पंडितराव |   मंगळवार, 3 एप्रिल 2018

सकाळी फिरायला जाताना दररोज रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे, नटबोल्ट ते वेचतात. ते आपल्याबरोबर आणलेल्या छोट्याशा पिशवीत जमा करतात आणि घरी नेतात. दररोज फिरण्यासाठी जाण्याचा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यांनी या आगळ्या-वेगळ्या सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून खंडूनच घेतला आहे.

कोल्हापूर - तुम्ही गाडीवरून जात असाल (मग गाडी कोणतीही असू दे, दुचाकी किंवा चार चाकी) आणि गाडी पंक्‍चर झाली. भर उन्हात तुम्हाला पंक्‍चर काढण्यासाठी मग काय काय करायला लागेल. हे आठवूनच कसेतरी झाले ना.. अशा कितीतरी अनेक वाहनचालकांना हे कष्ट पडू नयेत, म्हणून हिंदूराव कामते यांनी केवळ आपल्या नजरेत फरक केला.

सकाळी फिरायला जाताना दररोज रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे, नटबोल्ट ते वेचतात. ते आपल्याबरोबर आणलेल्या छोट्याशा पिशवीत जमा करतात आणि घरी नेतात. दररोज फिरण्यासाठी जाण्याचा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यांनी या आगळ्या-वेगळ्या सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून खंडूनच घेतला आहे.

हिंदूराव कामते म्हणजे दादा. त्यांचा स्वतःचा फौंड्री उद्योग आहे. हनुमान नगरात ते राहतात. दररोज सकाळी फिरण्यासाठी जाण्याचा त्यांचा एक ग्रुप आहे. हनुमाननगर येथून चालण्यास सुरुवात करायची... ते हॉकी स्टेडियम चौक, आयसोलेशन हॉस्पिटलमार्गे चेतना विकास मंदिर चालण्यासाठी जाणे, हे त्यांच्या नित्यनियमाचे. या मार्गावरून चालताना प्रत्येक वेळी त्यांच्या ग्रुपमधील एकजण रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे उचलून रस्त्याच्या कडेला फेकत असे. त्यांनी याविषयी विचारले असता गाडी पंक्‍चर झाल्याची घटना त्यांनी कामते यांना ऐकवली. यातूनच कामते यांनी रस्त्याच्या कडेला कशाला फेकायचे, आपणच गोळा करून नेऊ, असे ठरवले. 

दररोज सकाळी फिरायला बाहेर पडले, तरी हनुमाननगर ते चेतना विकास मंदिर या मार्गावर रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे, नटबोल्ट उचलू लागले. पाच महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम न चुकता सुरू ठेवला. फौंड्री उद्योगात असल्यामुळे स्क्रॅपची किंमत काय आहे, हे त्यांना माहीत आहेच; परंतु त्यापेक्षा गाडी पंक्‍चर झाल्यानंतर एखाद्याला होणारा मन:स्ताप किती तापदायक असू शकतो, त्याची जाणीव त्यांना अधिक आहे. यात अमूक एकाची गाडीसाठी करतोय असे नाही, तर अडीच किलोमीटर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना होणारा त्रास या कामातून श्री. कामते व त्यांचा ग्रुप वाचवतात, हे नक्की.

जगण्याकडे समतोल दृष्टीने पाहण्याचा नजरेचा फरक असतो, तो फक्त मी केला. रस्त्यावर असंख्य खिळे, नट-बोल्ट पडले असतात. त्यामुळे गाडी पंक्‍चर होणे आणि त्याचा त्रास हे खरोखरच खूप मनाला त्रास देणारे आणि वेळखाऊही असते. नजरेचा फरक करून दररोज फिरायला जाताना हे मी आणि माझे सहकारी गोळा करतो. पाच महिन्यांत १० किलो खिळे, बोल्ट साठले. विशेषतः स्पीडब्रेकरजवळ याची संख्या अधिक असते.  - हिंदूराव कामते  

Web Title: Kolhapur News Hindurao Kamte Venture special story

टॅग्स

संबंधित बातम्या

लोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन

पुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे  (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...

dhing tang
बोबडे वकील! (ढिंग टांग)

बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...

शहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व...

Fish died in temghar drain at temghar mahad
टेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले...