Sections

होळी रे होळी... यंदाही करू इको फ्रेंडली..!

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ‘होळी लहान करू- पोळी दान करू’ ही चळवळ आता अधिक व्यापक झाली आहे. यंदाही पर्यावरणपूरक होळीवर भर दिला जाणार आहे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याशिवाय शाळाशाळांतील हरित सेनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही केवळ पोळीदानच नव्हे, तर शेणी संकलित करून ग्रामपंचायतीकडे दिल्या जाणार आहेत. 

कोल्हापूर - ‘होळी लहान करू- पोळी दान करू’ ही चळवळ आता अधिक व्यापक झाली आहे. यंदाही पर्यावरणपूरक होळीवर भर दिला जाणार आहे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याशिवाय शाळाशाळांतील हरित सेनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही केवळ पोळीदानच नव्हे, तर शेणी संकलित करून ग्रामपंचायतीकडे दिल्या जाणार आहेत. 

एकट्या कोल्हापूर शहरातच प्रत्येक वर्षी किमान ६० हजार घरगुती आणि चार ते पाच हजारांवर सार्वजनिक होळ्या होतात. मात्र, पूर्वी भल्या मोठ्या होणाऱ्या होळीची उंची आता कमी झाली असून, परंपरा म्हणून लहान होळी साजरी करायची आणि उर्वरित शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्याची नवी परंपरा या निमित्ताने अधिक सजगपणे पुढे आली. 

१३ वर्षांपूर्वी २००५ मध्ये स्मशानभूमीला तीन लाखांवर शेणी दान झाल्या होत्या. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला; पण सहा-सात वर्षांपासून पुन्हा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळू लागला. २०११ मध्ये ५८ हजारांवर शेणी दान झाल्या. त्यानंतर सलग दोन वर्षे हा आकडा लाखाच्या आसपास राहिला. २०१४ मध्ये एकट्या महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टनेच एक लाख अकरा हजार शेणी स्मशानभूमीस दिल्या; तर २०१५ पासून किमान दीड लाखावर शेणी दान झाल्या. गेल्या वर्षी विविध संस्था, संघटना आणि सेवाभावी व्यक्तींनी पंचगंगा स्मशानभूमीकडे एकूण दोन लाख ७३ हजार ७६४ इतक्‍या शेणी सुपूर्द केल्या. 

मोफत अंत्यसंस्कार महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार होतात. एका अंत्यसंस्कारासाठी किमान ४०० शेणी, १२० किलो लाकूड लागते. स्मशानभूमीत रोज सरासरी १० ते १५ अंत्यसंस्कार होतात.

रस्त्यांची खबरदारी... शहरातील विविध चौकांत सार्वजनिक होळी साजरी केली जाते. मात्र, मुळात यातील बहुतांश रस्त्यांना डांबर लागते, ते ‘मार्च एंडिंग’च्या पूर्वी आठ-दहा दिवस अगोदर. याच काळात होळीचा सण येत असल्याने अनेक मंडळांनी होळी लहान करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या होळीमुळे रस्त्यात खड्डे पडतात आणि पुढे पावसाळ्यात हेच खड्डे अनेकांचे कंबरडे मोडतात, हा अनुभवही त्यामागे आहे. गुरुवारी (ता. १) सर्वत्र होळीचा सण साजरा होणार आहे.

Web Title: Kolhapur News EcoFriendly holi

टॅग्स

संबंधित बातम्या

माहिती आयुक्तांचे खंडपीठ हिंगोली भेटीला 

हिंगोली : जिल्ह्यात माहिती अधिकारांतर्गत आयुक्त कार्यालयाकडे दाखल झालेल्या अपिलांची संख्या लक्षात घेता माहिती आयुक्तांचे खंडपीठच मंगळवारपासून (ता. 18...

इंदापूरातील चारशे हेक्टर जमिन होणार राखीव वने

कळस : इंदापूर तालुक्यातील सुमारे चारशे हेक्टर क्षेत्र संरक्षित वन जमिन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सरकारी मालकीच्या या जमिनीवरील  ...

Organizing workshops for teachers of Nashik Zilla Parishad
नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी भरली कार्यशाळा

खामखेडा (नाशिक) : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'आय कॅन चेंज'ची भावना रुजावी व 'डिझाईन...

He established the Bappa with the difference of caste and religion
Ganesh Festival 2018 : जाती-धर्माचा भेद सारत 'त्यांनी' केली बाप्पाची स्थापना

उल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या...

Ganesh Festival : ​ सजावटीतूनही रिफायनरीला विरोध  

राजापूर - गेल्या वर्षभरापासून रिफायनरी विरोधात असंतोष धगधगत आहे. रिफायनरी विरोधाचे प्रतिबिंब गणेशोत्सवात आरासीत उमटले. रिफायनरी प्रकल्पग्रस्त...