Sections

येथे दोन बायका करणाऱ्यांना मिळणार बक्षीस......

टीम ई सकाळ |   शुक्रवार, 2 मार्च 2018
Money-Mario.jpg

संयुक्त अरब अमीरात: अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE). खलीज टाइम्सनुसार सयुंक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यावरून तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत. 

संयुक्त अरब अमीरात: अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE). खलीज टाइम्सनुसार सयुंक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यावरून तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत.  या देशाचे पायाभूत विकास मंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुईमी यांनी तरुणांना दुसऱ्या लग्नाला प्रोत्साहित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. तशी घोषणा फेडरल नॅशनल कॉन्सिलमाच्या बैठकीमध्ये केली. 

घोषणा करताना ते म्हणले कि दोन पत्नी असणाऱ्या सर्व लोकांना शेख झायद हाउसिंग कार्यक्रमा कार्यक्रमांतर्गत घरभाडे भत्ता दिला जाईल. हा भत्ता दुसऱ्या पत्नीच्या घर भाड्यासाठी असेल. म्हणजेच एक पत्नी असणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या घर भाडे भत्तापेक्षा अतिरिक्त असेल. पुढे ते असं म्हणतात कि दुसऱ्या पत्नीची जगण्याची व्यवस्था हि पहिल्या पत्नीप्रमाणेच असावी. घरभाडे भत्ता मिळाल्यामुळे लोक दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहित होतील. त्यामुळे अविवाहित तरुणींची संख्या घटण्यास मदत होईल.  

संयुक्त अरब अमीरातमध्ये तरुणींची संख्या वाढत आहे, यावर फेडरल नॅशनल कॉन्सिलचे सदस्य चिंतेत आहेत. त्यातील काही सदस्यांच्यामते लोक दसुरे लग्न न करून देशावरील आर्थिक बोजा वाढवत आहे. येणाऱ्या काळात या स्कीमला कसा प्रतिसाद भेटतो हे पहाणे मनोरंजक असणार आहे. 

Web Title: Emirati men with two wives will get housing allowance

संबंधित बातम्या

मधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर 

पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित...

महिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे!

मुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...

मुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी

पुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...

#Children'sDay संवाद हरवतो आहे...

संवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...

डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...

चाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील

मुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...