Sections

दगडूशेठ गणपती मंदिराबाबत 'या' आहेत पाच खास गोष्टी

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018
These are five special things related to Dagdusheth Ganapati Temple

दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते.

  • ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी सोन्याचे कान अर्पण केले होते.  
  • चैत्रमासातील कृष्णपक्षात जी चतुर्थी येते त्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पंचमीला गणेश मुर्तीला चंदन लेप लावला जातो. या महिन्यात विविध जातीच्या फुलांचा उपयोग गणेश मुर्तीच्या अभिषेकावेळी केला जातो. गेल्या पंचमीला मंदिरात पाच हजार फुलांची आरास करण्यात आली होती.   
  • दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे.  
  • प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारली जातेय. प्रसिद्ध कलाकार विवेक खटावर गेल्या अनेक वर्षांपासून हा देखावा साकारण्याचं काम करत असतात.  
  • ऋषीपंचमीला दगडूशेठ गणपती समोर होणारे महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण हा या मंडळाचा आणखी एक लक्षवेधी उपक्रम आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी यात 27 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. 
Web Title: These are five special things related to Dagdusheth Ganapati Temple

टॅग्स

संबंधित बातम्या

00accident_86_29.jpg
होंडा सिटी कारचा अपघातात दोघांचा मृत्यु; पाच जखमी

पुणे : खराडी येथे काल रात्री होंडा सिटी कारचा अपघात झाला. त्यामध्ये एका ज्येष्ठ महिलेसह 11 वर्षाच्या नातवाचा मृत्यु झाला. तर पाच जण जखमी आहेत. ...

Homeguard
समान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक

नागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

जातीपलीकडे जाऊन तीन गावांचा एकोपा

चिपळूण - संस्कृतीचा संगम होत कोकणातील तीन गावांत सलोखा आणि एकोपा जपत लोक एकत्र नांदत आहेत. शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही रत्नागिरी जिल्ह्यातील तीन...

Pig
डुकरे पकडण्यासाठी अधिकारी रस्त्यावर

पुणे - डुकरे पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही त्यांचा उपद्रव कमी होत नसल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांच...

आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीला मज्जाव - शेंड्ये

रत्नागिरी - रत्नागिरी स्थानकात दादर पॅसेंजरमधील जागेवरून पुन्हा मंगळवारसारखा (ता. १८) गोंधळ उडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रत्नागिरीच्या...