Sections

यंदा दगडूशेठ गणपती मंदिर साकारेल 'ही' प्रतिकृती

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018
Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Temple

भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यावर्षी 40 किलो वजनाचे अलंकार तयार करण्यात आले आहेत.

पुण्यातील सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणून दगडूशेठ गणपतीची ओळख आहे. हे भव्य मंदिर पुण्यातील बुधवार पेठ येथे उभारले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्त या मंडळाने 'प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिरा'ची प्रतिकृती साकारली आहे. बैठ्या प्रकारच्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. मूर्तीकडे बघितल्यावर कमालीची प्रसन्नता आणि सात्त्विकता एकवटलेली जाणवते. 

भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यावर्षी 40 किलो वजनाचे अलंकार तयार करण्यात आले आहेत. साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्णमुकूट, सूर्यकिरणांची नक्षी असलेले व रंगीत रत्नखडे जडवलेले कान, सातशे ग्रॅम वजनाचे शुंडाभूषण यासह रेशमी वस्त्रावर सोन्याच्या बुट्टया विणून तयार केलेला पोशाख व उपरणे या गणेशोत्सवात मूर्तीस अर्पण करण्यात येणार आहे. पु. ना. गाडगीळ सराफ यांनी हे अलंकार घडवले आहेत. पन्नास कारागिरांना या मूर्तीचे दागिने  घडविण्यासाठी पाच महिने इतका कालावधी लागला आहे.  

Web Title: Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Temple

टॅग्स