Sections

सात हजार पोलिसांचा गणेशोत्सवात बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे.

पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे.

पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

शहरातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे - ३ हजार २४५  ---------------------असा असेल पोलिस बंदोबस्त... अतिरिक्त पोलिस आयुक्त - २ पोलिस उपायुक्त - १५ सहायक पोलिस आयुक्त - ३६ पोलिस निरीक्षक - २०० सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक - ५२५ पोलिस शिपाई - ७ हजार ---------------------बंदोबस्तासाठी अन्य तुकड्या गृहरक्षक दल - ५०० राज्य राखीव पोलिस दल - ३ तुकड्या ---------------------छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस पथक चोरट्यांवर असेल विशेष लक्ष - साध्या वेशातील पोलिसांची पथके बाँबशोधक पथक - मानाच्या गणपतीसह प्रमुख मंडळांच्या ठिकाणी होणार तपासणी, मेटल डिटेक्‍टर बसविणार गर्दीची ठिकाणे - बेलबाग चौक, मंडई परिसर, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता यांसह सर्व गर्दीची ठिकाणे --------------------- साडेबारा हजार सीसीटीव्ही कॅमेरे मध्यवर्ती भाग, पेठांसह उपनगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्व सीसीटीव्हीद्वारे पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाद्वारे (कमांड सेंटर) लक्ष ठेवले जाणार आहे. संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तूंबाबत इथे द्या माहिती - पोलिस नियंत्रण कक्ष - १००

Web Title: seven thousand police security in Ganeshotsav

टॅग्स

संबंधित बातम्या

जमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी 

फलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...

बेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस 

मुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...

फेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला

पुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...

खासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती

पुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...

मार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले

पुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...

लग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या 

औरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...