Sections

चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरणपूरक मातीचे गणपती

अमित गवळे |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018
pali

पाली - लहानग्यांनाच जर पर्यावरण स्नेही व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशानेच येथील इको फ्रेंडली आर्ट कॅफे बीबीएमच्या तरुण व्यवस्थापीका सुरभी मोरे यांनी नुकतीच लहानग्यांसाठी येथे मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक नेहा तारकर देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.

पाली - लहानग्यांनाच जर पर्यावरण स्नेही व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशानेच येथील इको फ्रेंडली आर्ट कॅफे बीबीएमच्या तरुण व्यवस्थापीका सुरभी मोरे यांनी नुकतीच लहानग्यांसाठी येथे मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक नेहा तारकर देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत लहान मुलांनी स्वतः मातीच्या सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी मातीची (सिरॅमिक) भांडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी माती गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरली गेली. पालीत बहुदा अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे अभिषेक देशमुख यांनी सकाळला सांगितले. तर नेहा तारकर देशमुख म्हणाल्या की लहान मुलांनी बनविलेल्या ह्या गणेश मूर्ती ते आपल्या घरी घेवून गेले आहेत. आपल्या घरातल्या मूर्ती बरोबर ही मूर्ती मुले स्थापणार आहेत. आणि त्याबरोबरच घरी येणार्यांना पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्तिंची गरज व महत्व सांगणार आहेत. तर कॅफे बीबीएमच्या तरुण व्यवस्थापिका सुरभी मोरे म्हणाल्या की पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यकते उपक्रम आमच्या पर्यावरण स्नेही कॅफे मार्फत राबविले जातात. या उपक्रमात लहानमुले अगदी हरपुन गेली होती. त्यांनी खूप आनंदाने मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या आणि सोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला. या उपक्रमास स्वराज मोरे यांचे सहकार्य लाभले  

Web Title: Eco-friendly Ganesha saute made by a small hand

टॅग्स

संबंधित बातम्या

mahabtd
महाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच

अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...

जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल

अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...

mangalwedha
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...

mangalwedha
हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु

मंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन

जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...

Cracker-Sound
हा ‘आवाज’ दबलाच पाहिजे

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...