Sections

कोपा अमेरिका: कोलंबिया उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था |   रविवार, 19 जून 2016

ईस्ट रुदरफोर्ड - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने पेरुचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पीना हा या विजयाचा हिरो ठरला.

ईस्ट रुदरफोर्डमधील मेटलाईफ मैदानावर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुमारे 80 हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत एकही गोल करण्यात अपयश आल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. पेरुचा मधल्या फळीतील खेळाडू मिग्एल ट्राउको याने मारलेला चेंडू ओस्पीना सुरेखरित्या अडवून कोलंबियाचा विजय निश्चित केला.

पेनल्टी घेणाऱ्या कोलंबियाच्या तिघांनीही गोल करण्याची संधी दवडली नाही. तर, पेरुच्या ट्राउकोपाठोपाठ ख्रिस्तियन क्युवा यानेही पेनल्टी दवडली. यामध्ये कोलंबियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. मेक्सिको आणि चिली यांच्यातील विजेत्यासोबत कोलंबियाचा उपांत्य फेरीचा सामना येत्या बुधवारी होणार आहे. 

Web Title: Copa America: Colombia Overcome Peru in Penalty Shoot-Out to Reach Semis

टॅग्स

संबंधित बातम्या

Nancy Crampton Brophy
'पतीची हत्या कशी करावी?'च्या लेखिकेने केली पतीची हत्या?

ओरेगॉन : 'पतीची हत्या कशी करावी?' या पुस्तकाच्या लेखिकेने पतीची हत्या केली असून, तीन महिन्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली. परंतु हत्येचे कारण...

France
उमटीटीच्या गोलने 'गोल्डन जनरेशन' बाहेर (मंदार ताम्हाणे)

सॅम्युएल उमटीटी याने हेडरद्वारे मारलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्डन जनरेशन अशी ओळख असलेल्या बेल्जियमला उपांत्य...

Due to no other jersey he forced break
दुसरी जर्सी नसल्याने त्याला सक्तीचा ब्रेक? 

सोची - स्वीडनविरुद्ध जर्मनीच्या आक्रमणाचा धडाका रुडला झालेल्या दुखापतीमुळे खंडित झाला. त्याला पुन्हा वेग देण्यासाठी जर्मनीचे खेळाडू संघाच्या डगआउटकडे...

Nigeria beats Iceland in football World cup
'सुपर ईगल'च्या भरारीने आइसलॅंड कोलमडले

वोल्गोग्राड, ता. 22 ः पूर्वार्धात आइसलॅंडच्या पकडीत सापडलेल्या सुपर ईगल नायजेरियाने उत्तरार्धाच्या...

Brazil failed to win their opening game of a World Cup for the first time
ब्राझीलची बरोबरीने सुरवात 

रोस्टोव - सहाव्या विश्‍वविजेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या ब्राझीलला आपल्या मोहिमेची सुरवात मात्र बरोबरीने करावी लागली. सुरवातीपासून आक्रमक खेळ...

Denmark
डेन्मार्कची पेरूवर मात 

मॉस्को : डेन्मार्कने पेरूवर 1-0 असा विजय मिळविला. सामन्याच्या मध्यास पेरूच्या ख्रिस्तीयन क्‍युएवा याने पेनल्टी दवडली. त्यामुळे नंतर त्याला अश्रू...