Sections

बेळगाव जिल्ह्यात 2 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 12 मे 2018
voting

बेळगाव उत्तरला 40 टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिणला 37.24 टक्के मतदान, बेळगाव ग्रामीण भागात 36.3 टक्के मतदान करण्यात आले आहे. खानापूर मतदार संघात 40.16 टक्के मतदान झाले. 

बेळगाव : जिल्ह्यात आज (ता.12) दुपारी 2 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान झाले. चुरशीने मतदान जिल्ह्यात झाले असून, सर्वत्र अनेक ठिकाणी रांग लावून मतदानाचा हक्क बजाविला. दरम्यान, बहुतेक ठिकाणी पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी मतदान केले. 

बेळगाव उत्तरला 40 टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिणला 37.24 टक्के मतदान, बेळगाव ग्रामीण भागात 36.3 टक्के मतदान करण्यात आले आहे. खानापूर मतदार संघात 40.16 टक्के मतदान झाले. 

निपाणीत 48.27 टक्के, चिक्कोडी सदलगा 46.27 टक्के, अथणी 50.69 टक्के, कागवाड 40.2 टक्के, कुडची 27 टक्के, रायबाग 41 टक्के, हुक्केरी 39.11 टक्के, अरभावी 39.11 टक्के, गोकाक 40.77 टक्के, यमकनमर्डी 44.58 टक्के, बैलहोंगल 38.65, कित्तूर 26.33 टक्के, सौदत्ती 41.63 टक्के, रामदूर्ग 32.14 टक्के मतदान झाले आहे. 

मतदान केंद्र अधिकारी शुक्रवारी रात्रीच केंद्रात दाखल झाले. नियोजित वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी सात ते साडे सात वाजता संथ प्रतिसाद मिळाला. पण, त्यानंतर वेग वाढला. रांग लावून मतदान करण्यास सुरु झाले. सकाळी दहानंतर बहुतेक केंद्राच्या गर्दी दिसली. 

Web Title: voting in belgaum

टॅग्स

संबंधित बातम्या

narendra modi
चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर

औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...

औरंगाबाद - अगरबत्तीचे पॅंकिंग करताना दिव्यांग प्रतिष्ठानचे सदस्य.
दिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास

औरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...

Gym
वाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष

औरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...

live photo
लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला 

जळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...