Sections

दिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
Student rape gang rape for 11 hours in Running car

अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

पीडित मुलीच्या ओळखीतील तिघांनी बलात्कार केला. यामध्ये पीडित मुलीच्या परिचयातील एक विद्यार्थी, नातेवाईक आणि आणखी एकाचा समावेश आहे. या तिघांनी धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर पहाटे दीडच्या सुमारास पीडित मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. 

बलात्काराची ही घटना रविवारी (ता. 18) रोजी घडली असून, काल (सोमवार) उघडकीस आली. यातील आरोपींविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला पडकण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: Student rape gang rape for 11 hours in Running car

टॅग्स

संबंधित बातम्या

Congress Trying to establish power in Goa
गोव्यात काँग्रेसचा 'हात' सत्तेसाठी सरसावला

पणजी : काँग्रेसच्या गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे प्रभारी डॉ. ‌ए. चेल्लाकुमार गोव्यात पोहोचले आहेत. काँग्रेसने सरकार...

Cleaner dies in Delhi sewer family cant afford to even cremate him
स्वच्छता कामगाराच्या अंत्यविधीसाठी कुटुंब हतबल

दिल्ली : येथील पश्चिम डबरी परिसरात अनिल नामक 28 वर्षीय स्वच्छता कामगाराचा 20 फुट खोल गटारात पडून मृत्यू झाला. अनिल यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं...

Rape
अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार

नाशिक - जेवणातून गुंगीचे औषध देऊन १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीने तिची दिल्लीतील व्यक्तीला विक्री केली. त्यानंतर तिच्यावर गेली...

कर्नाटकचा सत्तासंघर्षः ...आता खलबते दिल्लीत

बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री...

Government does not going on phones call from Nagpur says Bhagwat
नागपूरहून आलेल्या फोनवर सरकार चालत नाही : भागवत

नवी दिल्ली- संघाला भारताची राज्यघटना संपूर्ण मान्य असून, घटनेविरुद्ध संघाने काम केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही, असे सांगत, सरसंघचालक मोहन भागवत...