Sections

गुजरातसमोर पाण्याचे संकट

महेश शहा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
narmada-dam

नर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला

अहमदाबाद - नर्मदा पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच गुजरातसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. नर्मदा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला असून, सौराष्ट्र आणि उत्तर गोव्यातील धरणांमध्येही अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नर्मदा धरणात केवळ 14.66 दशलक्ष फूट पाणीसाठा शिल्लक असल्याने औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आला आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे 15 मार्चनंतर सिंचनाबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा थांबविण्यात येईल, असे गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

पाणीसमस्येबाबत बोलताना सिंग म्हणाले, ""नर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला. पाच हजार 860 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या धरणात 21 जानेवारीला केवळ 455 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते. गेल्या वर्षी याच तारखेला गुजरातसाठी एक हजार 173 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते.''

""सद्यःस्थितीत राज्यासमोर पाण्याचे संकट असले तरी पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नर्मदा कॅनॉलवर अवलंबून असलेल्या अहमदाबाद, वडोदरामधील तसेच अन्य महापालिकांना पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: snn gujrat narmada dam

टॅग्स

संबंधित बातम्या

Railway
रेल्वेतही आता शॉपिंगची सुविधा

इगतपुरी - रेल्वेचा प्रवास स्वस्त अन्‌ मस्त मानला जातो. प्रवासात विविध सुविधा असल्यावर तो अधिकच...

Bullet-Train
बुलेट ट्रेनसाठी ठाणे-भिवंडीत जमिनीचे सर्वेक्षण उद्यापासून

मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे-भिवंडी पट्ट्यातील जमिनींच्या सर्वेक्षणाचे काम गुरुवारपासून (ता....

गुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू

अहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...

वसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ

बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...

लोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक 

पुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...

एटीएम फोडणारे तिघे गुजरातमध्ये जेरबंद

नाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात...