Sections

काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते मासा आणि पाण्यासारखे : अमित शहा

वृत्तसंस्था |   शनिवार, 31 मार्च 2018
The relation between Congress and corruption is like fish and water says BJP chief Amit Shah

''काँग्रेस सरकारला लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, या समुदायाला याची जाणीव आहे''.

-  अमित शहा , राष्ट्रीय अध्यक्ष ,  भाजप

नवी दिल्ली : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''काँग्रेस सरकारला लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, या समुदायाला याची जाणीव आहे''. तसेच ''काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते मासा आणि पाण्यासारखे आहे''.  

Siddaramaiah

सिद्धरामय्या म्हणाले, येडीयुरप्पाजींना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीतिमध्ये काँग्रेस बाधा आणत आहे. त्यांना (सिद्धरामय्या सरकार) लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, सरकारच्या या रणनीतिबाबत लिंगायत समाजाला याची जाणीव आहे. निवडणुकीनंतरच भाजप आपली शक्ती दाखवेल. तसेच ते पुढे म्हणाले, ''कर्नाटकातील जनता अनेक मुद्यांवरून राज्य सरकारविरोधात निराश आहे. यातील मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार. काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते हे मासा आणि पाण्यासारखे आहे. त्यांचे हे नाते कधीही न तुटण्यासारखे आहे. कर्नाटक सरकार काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचे एटीएम आहे. याशिवाय कर्नाटकचे काहीही महत्व नाही''. 

Web Title: The relation between Congress and corruption is like fish and water says BJP chief Amit Shah

टॅग्स

संबंधित बातम्या

फलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या! 

मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...

आरटीओ यंत्रणा "अनफिट'! 

मुंबई  - "राज्यातील प्रमुख 11 मोटार वाहन कार्यालयांतून (आरटीओ) वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही....

narendra modi
भाजपच्या हाती कोलित! (अग्रलेख)

मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

मुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...

बाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट

पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...