Sections

मोदीजी, जो उपदेश करता, त्याप्रमाणे वागा : राहुल गांधी

पीटीआय |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Rahul Gandhi

मोदीजी, नुदीदंते नडे'. केवळ भाषण करण्यासाठी तुम्हाला देशाने पंतप्रधान बनविले नाही. भारतातील गरिबांचे कोट्यवधी रुपये लुबाडून हिरे व्यापारी नीरव मोदी हा विदेशात पळून गेला, पण चौकीदाराने एक शब्दही काढला नाही

रामदुर्ग (कर्नाटक) - ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धनाढ्यांवर मेहेरनजर असल्याची टीका करीत भ्रष्टाचारविरोधात "लोकपाल'ची नियुक्ती त्यांनी अजून का केली नाही,' असा सवाल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केला. कर्नाटकातील बाराव्या शतकातील सुधारक बसवेश्‍वर यांचे "नुदीदंते नडे' (तुम्ही, जो उपदेश करता, त्या प्रमाणे वागा) हे वचन त्यांनी मोदींना उद्देशून उद्‌धृत केले.

उत्तर कर्नाटकमधील निवडणूक प्रचार दौऱ्यात रामदुर्ग येथील सभेत राहुल गांधी बोलत होते. पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराबत मोदी गप्प असल्याबद्दल, "" गुजरातमध्ये मोदीजींनी "लोकायुक्त'ची अंमलबजावणी केली नाही. पंतप्रधानपदाची मोदी यांची चार वर्षे झाली आहेत, तरी त्यांनी दिल्लीतही "लोकपाल' नियुक्त केलेला नाही,'' अशी खोचक टीका त्यांनी केली. आपण देशाचे चौकीदार असल्याचे मोदी सांगतात. पण, ते गैरव्यवहारांवर व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीतील वाढत्या उलाढालींवर मात्र ते बोलत नाहीत. देशाचा चौकीदार कर्नाटकात येऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर (माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा) भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करतात. हे मुख्यमंत्री तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत आणि भाजपच्या काळात चार मंत्रीही तुरुंगात होते,'' असे ते म्हणाले.

बसवेश्‍वर यांचे वचन उद्‌धृत करून राहुल म्हणाले, ""मोदीजी, नुदीदंते नडे'. केवळ भाषण करण्यासाठी तुम्हाला देशाने पंतप्रधान बनविले नाही. भारतातील गरिबांचे कोट्यवधी रुपये लुबाडून हिरे व्यापारी नीरव मोदी हा विदेशात पळून गेला, पण चौकीदाराने एक शब्दही काढला नाही.''

Web Title: Rahul Gandhi criticizes Narendra Modi

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अग्रगण्य पतसंस्था - हर्षवर्धन पाटील

इंदापूर- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. सोसायटीने पारदर्शी...

Life imprisonment for murder in land and house disputes case in Solapur
सोलापूर : जमीन व घराच्या वादातून खून केल्याप्रकरणात जन्मठेप 

सोलापूर : जमीन व घरच्या वादावरून खून केला प्रकरणात परमेश्वर मल्लेशी ख्याडगी ऊर्फ परमेश्वर गुरुलिंगप्पा लच्याण (वय 68, रा. नावंदगी ता. अक्कलकोट) यास...

yeola
शेतकऱ्यांना उपचारासाठी सरकार पाच लाखाची मदत देणार - दानवे

येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस...

His entry attracted the attention of the attendees in karhad
अन् 'यांच्या' एन्ट्रीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या !

कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या मनोमिलन होण्याच्या चर्चेला तालुक्यात अनेक दिवसांपासून वेग आला आहे. त्यातच...

file photo
रांजणगाव ग्रामपंचायतीत चुरशीची लढत

तळेगाव ढमढेरे: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी (ता. 27...