Sections

मोदी-शहादेखील करणार उपवास ! 

वृत्तसंस्था |   बुधवार, 11 एप्रिल 2018
Amit Shah, Narendra Modi

पंतप्रधान कार्यालयात मोदींचा उपवास 
कर्नाटकच्या रणधुमाळीत व्यग्र असेलेले जावडेकर म्हणाले, की येत्या 12 तारखेला भाजप खासदार कॉंग्रेसने संसद ठप्प पाडल्याचा निषेध म्हणून एका दिवसाचा उपवास करतील. मोदी हे असे नेते आहेत की नवरात्रीनिमित्त केलेल्या उपवासात ते आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या व कामकाज तेवढ्याच तडफेने पार पाडतात.

नवी दिल्ली : कॉंग्रेस व विरोधकांनी गोंधळ करून संसद अधिवेशन एक दिवसही चालू न दिल्याच्या निषेधार्थ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी येत्या 12 एप्रिलला एका दिवसाचा उपवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हेही या सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग देतील. पक्षाध्यक्ष शहा हे हुबळी येथे धरणे आंदोलनात सहभागी होतील. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बोलताना "पंतप्रधानांसह सारे भाजप कार्यकर्ते खरे सत्याग्रही व सच्चाग्रही आहेत. त्यामुळे भाजपच्या उपवासाची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही,'' असा टोला कॉंग्रेसला उद्देशून लगावला. 

पक्षनेतृत्वाने संसद अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या भाजप संसदीय बैठकीत 12 एप्रिलला उपवास करण्याची सूचना खासदारांना केली होती. याचे तपशील आता देण्यात येत आहेत. कॉंग्रेससह विरोधकांचा संसद बंद पाडण्याचा पवित्रा हा लोकशाहीविरोधी असून त्याविरुद्ध भाजप उपवास करेल, असे पक्षाने म्हटले आहे. भाजपचे आंदोलन हे "छोले भटोरे आंदोलन' नसेल तर तो खराखुरा सत्याग्रह किंवा आत्मक्‍लेशाचा मार्ग असेल, असा चिमटा पक्षाने कॉंग्रेसला काढला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसने दलितांवरील अन्यायाचे कारण सांगून दिल्लीत राजघाटावर जो उपवास केला त्याचा फियास्को झाल्याने भाजपने चांगलीच फिरकी घेतली होती. पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षांसह अरविंदर सिंह लवली, हारून यूसुफ आदी नेते उपोषणापूर्वी छोले भटोऱ्यांवर ताव मारताना छायाचित्रे व्हायरल झाल्याने कॉंग्रेसचा हा उपवास प्रचंड चेष्टेचा विषय ठरला होता. या प्रकरणानंतर भाजप प्रस्तावित उपवासाबद्दल अधिक सावध झाला आहे. 

पंतप्रधान कार्यालयात मोदींचा उपवास  कर्नाटकच्या रणधुमाळीत व्यग्र असेलेले जावडेकर म्हणाले, की येत्या 12 तारखेला भाजप खासदार कॉंग्रेसने संसद ठप्प पाडल्याचा निषेध म्हणून एका दिवसाचा उपवास करतील. मोदी हे असे नेते आहेत की नवरात्रीनिमित्त केलेल्या उपवासात ते आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या व कामकाज तेवढ्याच तडफेने पार पाडतात. उपवासाच्या काळातही मोदी 100 तासांमध्ये 50 कार्यक्रम करतात. पक्षाचे प्रवक्ते, खासदार नरसिंह राव म्हणाले, की पंतप्रधानही आपल्या कार्यालयातून या उपवास आंदोलनात सहभागी होतील. या दिवशी राज्यसभेचे भाजप खासदार देशभरात फिरून कॉंग्रेसच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश करतील. अमित शहा हुबळी येथील आंदोलनात सहभागी होतील. संसद ठप्प पाडल्याच्या निषेधार्थ 23 दिवसांच्या कामकाजाचे वेतन न घेण्याचा निर्णय भाजप खासदारांनी यापूर्वीच घेतला आहे. 

Web Title: Narendra Modi and Amit Shah to lead BJP fast against Congress divisive politics

टॅग्स

संबंधित बातम्या

Petrol
पेट्रोल 100?

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी...

Born minutes after launch, baby girl in Jharkhand becomes first beneficiary of Ayushman Bharat scheme
झारखंडमधील चिमुकली "आयुषमान'ची पहिली लाभार्थी

जमशेदपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन रविवारी (ता. 23) झारखंडमध्ये...

imran khan
इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

महाल ः नाग नदी सौंदर्यीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसोबत निदर्शने करताना राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्‍वर पेठे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर व इतर.
नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध

नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध नागपूर : नाग नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंची प्रत्येकी 15 मीटर जागा आरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात या परिसरातील...