Sections

मुलाला गोरे करण्यासाठी आईने घासले दगडाने

वृत्तसंस्था |   सोमवार, 2 एप्रिल 2018
crime

जेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे.

भोपाळ : भोपाळमधील निशातपूरा भागातील एका महिलेने आपल्या दत्तक मुलाला दगडाने घासून गोरे करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी या मुलाची सुटका केली आहे. 

याबाबत महिलेच्या बहिणीची मुलगी शोभना शर्मा हिने तक्रार केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुधा तिवारी या महिलेने दिड वर्षांपूर्वी मुलाला उत्तराखंडमधील मातृछाया संस्थेतून दत्तक घेतले होते. त्यांचे पती एका खासगी रूग्णालयात काम करतात.

तक्रारदार शोभना शर्मा हिच्या सांगण्यानुसार, 'जेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे. यामुळे मुलाच्या अंगावर अनेक जखमा दिसू लागल्या. मी तिला हा अत्याचार करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला पण तिने न ऐकल्यामुळे पोलिसांना सांगायची वेळ आली.'

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी मुलाला चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी हमिदीया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. पुढील चौकशीसाठी मुलाला चाईल्ड लाईनमध्येच ठेवले जाईल. यानंतर बाल कल्याण आयोगाच्या सदस्यांसमोर मुलाची चौकशी होईल. 

Web Title: mother scrubs 5-year-old with stone to make him fair in madhya pradesh

टॅग्स

संबंधित बातम्या

Kalyan Municipal Corporation taken action against Encroachment on Footpath
कल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे

कल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...

mahabtd
महाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच

अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...

Chair
बांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...

ullhasnagar.jpg
 उल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण

उल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...

अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी

मुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...

'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'

पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...