Sections

...म्हणून मोदी सरकार विरोधकांची समजूत काढणार

वृत्तसंस्था |   गुरुवार, 22 मार्च 2018
Union minister Vijay Goel will meet Opposition leaders to break Parliament logjam

सभागृहाचे कामकाज बंद पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोएल हे स्वत: पुढाकार घेणार असून, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरु असताना विविध मुद्यांवरून विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज बंद पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोएल हे स्वत: पुढाकार घेणार असून, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.

Minister Vijay Goyal

देशातील विविध मुद्दांवरून मोदी सरकारविरोधात विरोधकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीनुसारच विरोधकांकडून अविश्वास ठराव आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लोकसभेत विरोधकांची मोट बांधण्याचे काम केले जात आहे. संसदेच्या अधिवेशाचे 14 दिवस कोणत्याही चर्चेविना गदारोळात गेले. त्यामुळे मोदी सरकारकडून यावर कडक पावले उचलली जात आहेत.

गोयल यांनी सांगितले, की ''विरोधक फक्त माध्यमांसमोर बोलत आहेत. मात्र, सभागृहात ते यावर कोणतेही भाष्य, चर्चा करत नाहीत. संसदेचे अधिवेशात प्रति मिनिटासाठी साधारणत: अडीच लाख रुपये खर्च केला जात आहे. विरोधकांनी त्यांचे प्रश्न, त्यांची मते मांडण्यासाठी सभागृहात यायला हवे, यावर चर्चा करावी. मी स्वत: काँग्रेस, द्रमुक, टीडीपी आणि टीआरएस या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यासोबत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे. 

Web Title: Modi Government Union minister Vijay Goel will meet Opposition leaders to break Parliament logjam

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

Untitled-1.jpg
तेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु 

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...

nandgav
तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले

नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा...

Congress party burden on country says PM Narendra Modi
काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे : पंतप्रधान

नवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे...