Sections

देशात 1 कोटी रोजगारनिर्मिती होणार

पीटीआय |   शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 कोटी नवीन रोजगारनिर्मिती करणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 12 टक्केप्रमाणे तीन वर्षांच्या भविष्यनिर्वाह निधीची तरतूदही सरकारकडून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीसाठी नव्याने पावले उचलली जात असून, याचा सर्वाधिक फायदा युवावर्गाला होणार आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 कोटी नवीन रोजगारनिर्मिती करणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 12 टक्केप्रमाणे तीन वर्षांच्या भविष्यनिर्वाह निधीची तरतूदही सरकारकडून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीसाठी नव्याने पावले उचलली जात असून, याचा सर्वाधिक फायदा युवावर्गाला होणार आहे. 

प्रायोगिक तत्त्वावर प्रथमत: संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारासंबंधी मंत्रिमंडळाच्या समितीने रोजगारनिर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी दिली. 

गंगवार म्हणाले, की सरकारच्या या योजनेमुळे 1 कोटी नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे. या योजनेसाठी अंदाजे 6 हजार 500 ते 10 हजार कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्यात येणार आहे. सरकारच्या नव्या धोरणानुसार आधी ज्या कर्मचाऱ्यांना मुख्य वेतनात 8.33% भविष्य निर्वाह निधीचे योगदान दिले जात होते, ते आता 12 टक्के कंपनी योगदान राहणार आहे. 

होणारे फायदे 

  1. असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सामाजिक सुरक्षेअंतर्गत भविष्यनिर्वाह निधी व निवृत्तिवेतन आदी सुविधांचा लाभ मिळेल. 
  2. मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराचा लाभ होणार 
  3. आतापर्यंत 500 कोटी रुपये खर्च 
  4. आतापर्यंत देशभरातील 31 लाख बेरोजगारांना फायदा 

अशी आहे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना  प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना ऑगस्ट 2016 मध्ये सुरू झाली होती. याअंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत कंपनीचे योगदान सरकार करीत आहे. हे योगदान कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन + महागाई भत्ता 8.33% असे असते.

Web Title: Modi government plans to create 1 crore jobs in India

टॅग्स

संबंधित बातम्या

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

Avinash Dharmadhikaris Shiv Chhatrapati Lecturement at Latur
लक्षात ठेवा, खचण्यातच खरा पराभव असतो : अविनाश धर्माधिकारी

लातूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून देदिप्यमान बुद्धीमत्ता असलेली मुलेसुद्धा खचतात. मी इतका अभ्यास केला, मला काय मिळाले ? असे म्हणतात आणि मोडून...

Congress Trying to establish power in Goa
गोव्यात काँग्रेसचा 'हात' सत्तेसाठी सरसावला

पणजी : काँग्रेसच्या गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे प्रभारी डॉ. ‌ए. चेल्लाकुमार गोव्यात पोहोचले आहेत. काँग्रेसने सरकार...

Digital Cleanliness
डिजिटल स्वच्छतेची गरज

ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे...

Homeguard
समान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक

नागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...