Sections

'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'

वृत्तसंस्था |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
sridevi

भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

मुंबई : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचे अनेक नवनवीन पैलू देखील समोर येत आहेत. या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

'माझ्या मते श्रीदेवी जास्त प्रमाणात मद्य पीत नसून, कधीतरी काही अंशी बीअरचे सेवन करत होत्या, त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून ही हत्या आहे', असा अंदाज एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या मृत्यूचा संबंध त्यांनी बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शनशी जोडला. 

याबाबत बोलताना, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज का तपासले नाही? असाही सवाल त्यांनी केला. कुटूंबातील लग्नसमारंभासाठी दुबईत गेलेल्या श्रीदेवी हॉटेलच्या रूममधील बाथरूमच्या बाथटबमध्ये बेशुध्दावस्थेत सापडल्या. त्यावेळी त्यांचे पतीही तेथे उपस्थित होते. पण अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.     

Web Title: Marathi news Sridevi murdered subramniam swamy bjp leader

टॅग्स

संबंधित बातम्या

Marathi Actress Tejaswini Pandit Draw A Bal Ganesh Picture
तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून साकारला ‘फिल्ममेकर बालगणेशा'

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेले एक दशक आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. या गुलाबाच्या कळीचे टॅलेंट फक्त अभिनयापुरतेच मर्यादित...

Bigg Boss 12: Anup Jalota Girlfriend Jasleen Matharu in bigg boss house
अनुप-जसलीन 'हटके जोडी' बिग बॉसमध्ये!

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो अर्थात ‘बिग बॉस’च्या बाराव्या मोसमाची सुरुवात झाली असून, 65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा हे त्यांच्या 28...

Thugs Of Hindostans Logo Video Launched
'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान'चा लोगो प्रदर्शित (व्हिडीओ)

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्टारर 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' या सिनेमाची चर्चा बऱ्याच दिवसापासून होती. अभिनेत्री...

Smita-Gondkar
#BappaMorya ‘सोसायटी गणेशोत्सवा’तून आपुलकी (व्हिडिओ)

पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी...

#BappaMorya ‘सोसायटी गणेशोत्सवा’तून आपुलकी

पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल...