Sections

श्रीदेवींचा मृत्यु बुडूनच; शरीरात मद्यांशही आढळला

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
sridevi

या अहवालानुसार मद्याच्या अंमलाखाली असलेल्या श्रीदेवी या बाथटबमध्ये कोसळल्या आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीदेवी यांचे पती व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना त्यांचा मृतदेह आढळला होता

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यु बाथटबमध्ये पडून बुडाल्यामुळे झाल्याचे वृत्त संयुक्त अरब अमिरातीमधील गल्फ न्यूज या वृत्तसंस्थेने दिले आहे. श्रीदेवी यांच्या शरीरामध्ये मद्याचा अंशही आढळल्याचे गल्फ न्यूजने म्हटले आहे. श्रीदेवी यांचा शवविच्छेदन अहवाल दुबईमधील संबंधित संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे.

या अहवालानुसार मद्याच्या अंमलाखाली असलेल्या श्रीदेवी या बाथटबमध्ये कोसळल्या आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीदेवी यांचे पती व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना त्यांचा मृतदेह आढळला होता. श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे भारतीय चित्रपटसृष्टीस बसला असून समाजातील विविध स्तरांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" म्हणजेच श्रीदेवी 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका लग्नसमारंभास दुबई येथे गेल्या असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

श्रीदेवी यांच्या निधनाला 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. त्यांचे पार्थिव दुबईहून भारतात अजूनही आणले गेले नाही. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाबद्दल समजताच बॉलीवूडमधील दिग्गजांसह चाहत्यांनीही श्रीदेवी यांच्या घराबाहेर गर्दी केली. दुबईतील कायदेशीर प्रक्रियेमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबियांना मिळण्यास उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Marathi news mumbai news sridevi forensic report heart attack

टॅग्स

संबंधित बातम्या

rafale deal
सरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...

Mahadevrao Mahadik
...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे? जर ते तयार नसतील तर मी...

#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...

समाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...

शहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व...

Fish died in temghar drain at temghar mahad
टेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले...