Sections

बंगालच्या उपसागराच्या तळाशी सापडला मिथेनचा मोठा साठा 

अवित बगळे  |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Meeting

पणजी (गोवा) : कृष्णा गोदावरीचे खोरे आणि बंगालच्या उपसागराच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे सापडल्याची घोषणा दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आज येथे केली. हे वायूचे साठे समुद्र तळाशी केवळ तीन मीटर खोलीवर असल्याने वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सातशे मीटर खोलवरपर्यंत वर येत असल्याचे या संस्थेच्या संशोधकांना आढळून आले आहे. 

पणजी (गोवा) : कृष्णा गोदावरीचे खोरे आणि बंगालच्या उपसागराच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे सापडल्याची घोषणा दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आज येथे केली. हे वायूचे साठे समुद्र तळाशी केवळ तीन मीटर खोलीवर असल्याने वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सातशे मीटर खोलवरपर्यंत वर येत असल्याचे या संस्थेच्या संशोधकांना आढळून आले आहे. 

संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी ही माहिती आज दिली. 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान ही प्रत्यक्ष पाहणी मोहिम राबविण्यात आली होती. समुद्राच्या पाण्याच्या अंतरंगाचे छायाचित्रण करण्याचे तंत्रज्ञान एनआयओने विकसित केले आहे. त्या आधारे घेतलेल्या छायाचित्रांत सातशे मीटर खोलीवर काही बुडबुडे दिसले. त्या बुडबुड्यांच्या स्त्रोतांचा शोध घेताना मिथेन वायूचा शोध लागला आहे. उपसागराच्या आणि खोऱ्यातील तळातील मातीचे पृथ्थकरण जहाजावर केल्यावर मिथेनचा मोठा साठा त्या भागात असल्याचे दिसून आले. हा साठा समुद्राच्या तळाशी केवळ तीन मीटरवर असल्याने तो बाहेर काढण्यासाठी नव्याने तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. जपान, चीनसारखे देश या तंत्रज्ञानावर काम करत आहेत भारताकडे तसे तंत्रज्ञान सध्या नाही मात्र ते विकसित केले जाऊ शकते. 

ते म्हणाले, समुद्राच्या तळाशी भिन्न वातावरणात, भिन्न पाण्याच्या दाबाखाली जगणारी वेगळीच जीवसृष्टी आढळली आहे. यातील काही जीवजंतू हे मिथेन वायूच्या निर्मितीला कारण असू शकतात. त्यावर यापुढे संशोधन केले जाणार आहे. तेथे खेकड्यांच्या आकाराचे तीन इंच आकाराचे काही प्राणी आढळले, स्टार फीशसारखा प्राणी तर गांडुळसदृश्‍य प्राणीही आढळले. त्यातील काही प्राणी जहाजावर आणले गेल्यानंतरही वातावरण व दाबाचा बदल सहन करत जीवंत होते, अशी माहिती त्यांनी दिली. 

संस्थेने पवन देवांगण आणि अनिदा मुजूमदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविली होती. या मोहिमेदरम्यान समुद्राच्या तळाची माती जी एरव्ही हिरवट रंगाची असते ती काळी आढळली. त्याचे कारण म्हणजे या मातीत आयर्न मोनो सल्फाईटचे प्रमाण नेहमीच्या प्रमाणापेक्षा हजारपट जास्त आहे. त्याची कारणेही शोधावी लागणार आहेत. या साऱ्या जीवसृष्टीचा उपयोग औषध निर्मिती उद्योगासाठी होण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यासाठी सखोल संशोधनाची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुद्राच्या तळाशी दडलेल्या वायूचा 10 टक्के जरी उपयोग झाला तरी 100 वर्षांची उर्जेची गरज भागू शकेल असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

यापुढील संशोधनासाठी रिमोटने चालणारे स्वयंचलीत वाहन समुद्राच्या तळाशी पाठविण्यात येणार आहे. त्याशिवाय याच तंत्रज्ञानाने अन्य कोणत्या ठिकाणी वायूचे साठे आहेत का याची माहिती संकलीत केली जाईल अशी माहिती दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी  दिली.

Web Title: Marathi news goa news bay of bengal methane found

टॅग्स

संबंधित बातम्या

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...

पुणे शहरात नीचांकी तापमान

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...

dhing tang
वनमंत्री वाचवा! (ढिंग टांग)

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...

santosh shintre
जिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...

समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...

gaja
तमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू

चेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...

मुंबईचा पारा 35.1 अंशांवर 

मुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...