Sections

थेट विक्री उद्योगात महाराष्ट्र अव्वल स्थानी 

महेश शहा |   शनिवार, 28 एप्रिल 2018
Maharashtra

भारतातील थेट विक्री उद्योग (राज्यनिहाय टक्केवारी) 
महाराष्ट्र : 12.89 
प. बंगाल : 9.10 
तमिळनाडू : 8.83 
कर्नाटक : 7.81 
उत्तर प्रदेश : 7.36 
गुजरात : 6.99

अहमदाबाद : भारतातील थेट विक्री उद्योगात 2016-17मध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, गुजरात सहाव्या स्थानावर आहे. देशातील थेट विक्री उद्योगात महाराष्ट्राचा वाटा 12.89 टक्के असून, त्यापाठोपाठ पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे, तर 6.99 टक्के वाटा असलेला गुजरात सहाव्या क्रमांकावर आहे.

भारतीय थेट विक्री उद्योग संघटनेचा (आयडीएसए) 2016-17चा वार्षिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला असून, या उद्योगासमोर वस्तूंची थेट विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठे आव्हान निर्माण केले असल्याचे त्यात म्हटले आहे. 

देशातील थेट विक्री उद्योगात एकट्या पश्‍चिम विभागाचा वाटा 24.6 टक्के आहे. पश्‍चिम विभागातही महाराष्ट्राने (52.3 टक्के) सर्वोत्तम कामगिरी नोंदविली असून, त्यापाठोपाठ गुजरातचा (28.4 टक्के) क्रमांक लागतो. थेट विक्री उद्योगामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ऍम्वे, ओरिफ्लेम आणि टपरवेअर अशा कंपन्यांचा या उद्योगात समावेश होतो. या उद्योगामध्ये 2016-17मध्ये दहा हजार 324 कोटी रुपयांची विक्री केली असून, मागील वर्षी ती आठ हजार 308 कोटी रुपये येवढी होती. 

भारतातील थेट विक्री उद्योग (राज्यनिहाय टक्केवारी)  महाराष्ट्र : 12.89  प. बंगाल : 9.10  तमिळनाडू : 8.83  कर्नाटक : 7.81  उत्तर प्रदेश : 7.36  गुजरात : 6.99

Web Title: maharashtra first in direct sale industry

टॅग्स

संबंधित बातम्या

MES
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ही नामांकित संस्था 19 नोव्हेंबरला 159व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने 24 नोव्हेंबर (...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

yavat
नांदूरच्या कंपनीतून 'टाईल्स' चोरी करणारी टोळी जेरबंद

यवत - नांदूर (ता. दौंड) येथील टाईल्स कंपनी मधील टाईल्सची चोरी करणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. यासाठी त्यांना स्थानिक पोलिस मित्रांची मोठी...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...

Chandrakant Patil
मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील

फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...

बाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...