Sections

"एमपी'च्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात

वृत्तसंस्था |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
congress

कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली.

कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली. पटेल यांनी सरकारने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्याने यंदाही केंद्र सरकारचा "कृषी कर्मण' पुरस्कार प्राप्त केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यपालांचे भाषण निष्प्रभ असून, सरकार यशाच्या केवळ गप्पा मारत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी केली.

कपात करूनही इंधनावरील कर इतर राज्यांच्या तुलनेत जास्तच असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून, सरकारने पेट्रोल उत्पादनांवरील सेस वाढविल्याचे बच्चन यांनी निदर्शनास आणून दिले. ही उत्पादने वस्तू सेवा कराअंतर्गत आणावीत, अशी कॉंग्रेसची मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: madhya pradesh congress

टॅग्स

संबंधित बातम्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; भोकर तालुक्यातील घटना

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोळगाव (ता. भोकर) शिवारात शनिवारी (ता....

ujwal-nikam.jpg
आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम

परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे...

'येत्या 5 वर्षात राज्यात आमचेच सरकार' 

पणजी (गोवा) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केडरचे माजी प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज अधिकृतपणे गाेवा सुरक्षा मंच या पक्षातून राजकारणात प्रवेश केला...

'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मीच"

पणजी- मुख्यमंत्रीपदाचा आपण उमेदवार आहे असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला...

blazer.jpg
मंगळवेढ्यात ब्लेजरमुळे शिक्षकांची धावपळ

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी गणवेश सोबत ब्लेजर घालण्याचा निर्णय घेतल्याने आणि ब्लेजर न वापरणाऱ्या शिक्षकांच्या सेवा...

"पिंजऱ्यातील पोपट' झाला दानव'

"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है...