Sections

लोकमान्य टिळक 'दहशतवादाचे जनक' 

वृत्तसंस्था |   शनिवार, 12 मे 2018
Lokmanya Tilak

टिळकांचा अशा प्रकारे उल्लेख प्रसिद्ध झाल्याने राजस्थानमधील इतिहासतज्ज्ञांनी खंत व्यक्त केली आहे. हे पुस्तक अजमेर शाळेतील विद्यार्थी वापरतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेहरू, गांधी व विनायक दामोदर सावरकर यांचे योगदानाकडे दुर्लक्ष केल्याने यापूर्वीही येथील पाठ्यपुस्तकांबद्दल वाद निर्माण झाले आहेत. पाठ्यपुस्तके बदलून शिक्षणाचे खासगीकरण करीत असल्याची टीका कॉंग्रेसने भाजप सरकारवर वेळोवेळी केली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या सुरवातीच्या काळात जनमानसांत इंग्रजांविरुद्ध अंसतोषाचा अंगार फुलविणारे व "असंतोषाचे जनक' म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना "दहशतवादाचे जनक' (फादर ऑफ टेरेरिझम) ठरविण्यात आले आहे. राजस्थानमध्ये इंग्रजी माध्यमातील आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात अशा प्रकारे लोकमान्यांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आले आहे. 

या पुस्तकाचे प्रकाशन मथुरेतील एका प्रकाशन संस्थेने केले आहे. प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील प्रकरण 22 मधील "इन्सिडंट्‌स ऑफ नॅशनल मूव्हमेंट ड्युरिंग एटिंन्थ अँड नाईटिन्थ सेंच्युरी' (अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळीतील घटना) या शीर्षकाखाली दिलेल्या माहितीत पान क्र.267 वर लोकमान्य टिळक यांची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, टिळक डेमॉन्स्ट्रेटेड अ पाथ टुवडर्स नॅशनल मूव्हमेंट. सो ही इज कॉल्ड ऍज द "फादर ऑफ टेरेरिझम' (टिळक यांनी राष्ट्रीय चळवळीला मार्ग दाखविला. म्हणून त्यांना "दहशतवादाचे जनक' असे संबोधले जाते) असे अवमानकारक वाक्‍य छापले आहे. 

टिळकांचा अशा प्रकारे उल्लेख प्रसिद्ध झाल्याने राजस्थानमधील इतिहासतज्ज्ञांनी खंत व्यक्त केली आहे. हे पुस्तक अजमेर शाळेतील विद्यार्थी वापरतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेहरू, गांधी व विनायक दामोदर सावरकर यांचे योगदानाकडे दुर्लक्ष केल्याने यापूर्वीही येथील पाठ्यपुस्तकांबद्दल वाद निर्माण झाले आहेत. पाठ्यपुस्तके बदलून शिक्षणाचे खासगीकरण करीत असल्याची टीका कॉंग्रेसने भाजप सरकारवर वेळोवेळी केली आहे. 

पुस्तकाबद्दल मते..  अजमेर शाळेचे मुख्याध्यापक ः शाळेत आपण नव्याने रुजू झाल्याने प्रकाराबाबत आपल्याला माहीत नाही; पण याप्रकरणी लक्ष घालून निश्‍चितपणे कारवाई करू. 

विद्यार्थी ः राजस्थान शिक्षण मंडळ केवळ हिंदी भाषेतून पाठ्यपुस्तके छापतात. कोणतेही इंग्रजी माध्यमातील पुस्तक उपलब्ध नसल्याने हे संदर्भ पुस्तकच आम्हाला वापरावे लागते. 

स्टुडंट ऍडव्हाझर पब्लिकेशन ः राजस्थान शिक्षण मंडळाच्या नियमांनुसारच आम्ही हे पुस्तक छापले आहे.

Web Title: Lokmanya Tilak is the father of terrorism, says Class 8 Rajasthan textbook

टॅग्स

संबंधित बातम्या

सुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने!

सहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...

Gyan Dev Ahuja
भाजप नेत्याने राहुल गांधींना म्हटले औरंगजेब

जयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे...

Crime
बारावीच्या उत्तरपत्रिका गुजरातला दारूच्या ट्रकमध्ये

मालेगाव - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या (एचएससी) उत्तरपत्रिका वाहतुकीची...

Rajasthan Shocker RTI receive used condoms as reply
आरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम

जयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...

उत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष...

बळासाठी 'छळा'कडे !

गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...