Sections

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन ; महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

वृत्तसंस्था |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
Indian Army Jawan Martyr Pakistan Ceasefire one martyr and four injury

महाराष्ट्रातील परभणीतील चाटोरी तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सातत्याने केले जात आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाला असून, आणखी चार जवान जखमी झाले आहेत. हा गोळीबार जम्मू-काश्मीरमधील पूंच जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आला.  

ceasefire army

जम्मू-काश्मीरच्या पूंच जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लष्करातील एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले असून, महाराष्ट्रातील परभणीतील चाटोरी तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 

दरम्यान, काल (सोमवार) दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 अतिरेक्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला.

Web Title: Indian Army Jawan Martyr Pakistan Ceasefire one martyr and four injury

टॅग्स

संबंधित बातम्या

भारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा

श्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....

Mehbooba Mufti
मेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र

श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...

file photo
पाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...

मेजर शशिधरन नायर यांना अखेरचा निरोप

पुणे / खडकवासला - पाणावलेले डोळे... सुन्न करणारे वातावरण... अस्वस्थ मने... ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशासाठी बलिदान देणारे मेजर शशिधरन नायर...

चीन सीमेनजीक बांधणार  44 महत्त्वाचे रस्ते

नवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...

honeytrap
भारतीय लष्कराचे 50 जवान 'हनीट्रॅप'मध्ये?

नवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे....