Sections

केवळ 11 दिवसात लावला आसारामचा छडा!

वृत्तसंस्था |   बुधवार, 25 एप्रिल 2018
lamba

या शोधसत्रात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही न डगमगता हे काम चालूच ठेवले. अखेरीस यात आम्हाला यश आले. या प्रकरणाची चौकशी करताना मला जवळपास 1600 धमक्यांची पत्रे आली, पण न घाबरता व कोणताही दबाव सहन न करता आम्ही हा शोध चालूच ठेवला. अशी भावना लांबा यांनी व्यक्त केली.

जोधपूर : बरेच वर्ष चाललेल्या आसारामबापू विरोधात चालू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज निकाल लागला. या खटल्यात आसारामसह दोन जणांना दोषी तर दोघांना निर्दोष सोडण्यात आले आहे. आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा आणि प्रकाश हे दोघे निर्दोष असल्याचा निर्णय जोधपूर सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा छडा लावणारे आयपीएस अधिकारी अजय पाल लांबा यांनी केवळ अकरा दिवसात या बलात्कार प्रकरणाचा शोध घेतला व आसारामला ताब्यात घेतले. 

कसे सुरू झाले शोधसत्र? 21 ऑगस्ट 2013 साली पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत दिल्ली पोलिसांबरोबर आयपीएस अधिकारी अजय पाल लांबा यांची भेट घेण्यासाठी आली. त्यावेळी लांबा हे जोधपूरचे पोलिस उपायुक्त होते. ही मुलगी तिच्यावर आसारामकडून झालेल्या अत्याचार व बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. 

'त्यांची तक्रार प्रथम ऐकून घेतल्यानंतर, आम्हाला या प्रकरणात गडबड वाटली. हे लोक खोटी तक्रार नोंदवत आहे असा वाटले. काही वेळी बड्या लोकांना अडकवण्यासाठी हक्कांचा गैरफायदा घेतला जातो. पण सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर त्या मुलीच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटले. त्या मुलीने आसारामच्या जोधपूर पासून 38 किमीवर असलेल्या मनाई या आश्रमाचा नकाशा काढून दाखवला. याशिवाय आश्रमातील ज्या खोलीत तिच्यावर अत्याचार व बलात्कार झाला त्या खोलीचाही नकाशा व वर्णन तिने सांगितले. एखाद्या खोलीचा नकाशा सांगणे हे तिथे प्रत्यक्ष असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या मुलीवर विश्वास ठेवून आम्ही पुढील शोध चालू केला.', असे लांबा यांनी सांगितले. 

त्यांनंतर लांबा यांना या प्रकरणातील एक एक धागा मिळत गेला. उत्तर प्रदेशातील मेरठ मधील एका कुटूंबाने आसाराम विरोधात अशाच प्रकारची तक्रार नोंदवली होती. जेव्हा लांबा त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांना कळाले की, हे कुटूंब तक्रार नोंदवायला तयार नव्हते. या गोष्टीवरून पुढील तर्क लावण्यात आले. 

asaram

अखेरीस 31 ऑगस्ट 2013 ला पोलिसांनी यशस्वीपणे आसारामला पकडले. पोलिसांना त्याच्या आश्रमाचा नक्की ठावठिकाणा माहिती नव्हता. 5 पोलिस व 6 कमांडोंसह आसारामच्या इंदोरमधील आश्रमावर धाड टाकली. याचा राग आसारामला आला व तो 31 ऑगस्ट 2013ला भोपाळच्या विमानतळावर आला. पोलिसांनी ही महिती प्रसारमाध्यमांना सांगितली व आसारामचा पाठलाग केला. आसारामला पोलिसांच्या या शोधमोहिमेबद्दल जराही कल्पना नव्हती. अखेरीस त्याला इंदोरच्या आश्रमातून अटक करण्यात आले. अशी माहिती लांबा यांनी सांगितली. 

या शोधसत्रात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही न डगमगता हे काम चालूच ठेवले. अखेरीस यात आम्हाला यश आले. या प्रकरणाची चौकशी करताना मला जवळपास 1600 धमक्यांची पत्रे आली, पण न घाबरता व कोणताही दबाव सहन न करता आम्ही हा शोध चालूच ठेवला. अशी भावना लांबा यांनी व्यक्त केली.

या संबंधित अधिक बातम्या -आसाराम बलात्कारी; जोधपूर कोर्टाचा निकालआसाराम बलात्कारप्रकरण ; चौकशी अधिकाऱ्याला 2 हजार धमकीपत्रेअसा होता आसारामविरोधातला खटला..  

Web Title: How Jodhpur police nailed him in 11 days

टॅग्स

संबंधित बातम्या

Sandeep Shetty
माफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...

बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...

रिक्षात विसरलेल्या पर्समधील दागिने दिले मित्राकडे! 

सोलापूर : रिक्षात विसरलेले पाच लाख 10 हजार रुपयांचे 17 तोळे सोन्याचे दागिने अप्रामाणिकपणे लपवून ठेवणाऱ्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने अटक केली....

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर

औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...

गेवराई - शहराजवळ दुचाकीला धडक दिल्यानंतर गॅरेजमध्ये घुसलेले ट्रॅक्‍टर.
वाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी

गेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...

sapna chaudhary
सपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू

पटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...