Sections

आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे प्रयत्न: रामदास आठवले

अवित बगळे |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
ramdas athawale

पणजी (गोवा): अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गात समाविष्ट नसलेल्या जातींतील आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर याविषयी चर्चाही झाली आहे, अशी माहिती केंद्रीय समाजकल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पर्वरी येथे दिली.

पणजी (गोवा): अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गात समाविष्ट नसलेल्या जातींतील आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर याविषयी चर्चाही झाली आहे, अशी माहिती केंद्रीय समाजकल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पर्वरी येथे दिली.

गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी राज्य सरकारच्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक सचिवालयातील परिषद सभागृहात घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या लोकसंख्येच्या जास्तीत जास्त 50 टक्के आरक्षण देता येते. तेवढेच द्यावे असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मात्र ते अंतिम नव्हे. संसदेत कायदा संमत करून आरक्षणाची कक्षा रूंदावता येऊ शकते. देशातील विविध भागातून अनेक समाज आर्थिक मागासलेपणाचे कारण पुढे करून आरक्षणाची मागणी करू लागले आहेत. त्यांच्या भावनांची दखल केंद्र सरकारला घ्यावीच लागणार आहे.

लोकसभेची निवडणूक जवळ येत चालली आहे. तसतशा या मागण्या वाढतील. सध्या अनुसुचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय यांना असलेले आरक्षण कायम ठेऊन या नव्या घटकांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे लागणार आहे. यासाठी आरक्षणाची मर्यादा संसदेच्या माध्यमातून 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावी असा विचार आहे. नव्या घटकांना आर्थिक निकषांनुसार आरक्षण द्यावे.ज्या कुटुंबांचे उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे. यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी मी चर्चा सुरु केली आहे. त्यांनाही हा विषय पटू लागला आहे.

दलितांवर देशात होणाऱ्या अत्याचारामागे आरक्षण हे प्रमुख कारण आहे. आरक्षणामुळे आपली संधी हिरावली जात असल्याचे मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे त्याही घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे असा हा विचार आहे. त्यातून सामाजिक असंतोषही संपेल असे वाटते, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: goa news caste reservation ramdas athawale

टॅग्स

संबंधित बातम्या

narendra modi
चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

deshmukh
माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...

In the Lok Sabha Congress seats is Increasing
लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...

sadhvi rutumbara
विहिंपमधील ‘भाऊबंदकी’ संपवेल का ‘ऋतंबरा’?

नागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला...

कॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच "बूस्टर'...! 

जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...