Sections

मल्ल्या, मोदींसारख्यांची मालमत्ता होणार जप्त...

वृत्तसंस्था |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
economic offenders

कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या हा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून फरार होण्यात यशस्वी झाल्यानंतर अशा स्वरुपाचा कायदा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या कायद्याची निर्मिती करण्यासाठीचे निर्देश सक्तवसुली संचलनायास देण्यात आले आहेत

नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहार करुन देशाबाहेर पळून गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारकडून लवकरच मांडण्यात येईल, अशी शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

"फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल' या विधेयकाद्वारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असलेल्या या विधेयकास कायदा मंत्रालयाने काही सूचनांसहित मान्यता दिली आहे. कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या हा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून फरार होण्यात यशस्वी झाल्यानंतर अशा स्वरुपाचा कायदा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या कायद्याची निर्मिती करण्यासाठीचे निर्देश सक्तवसुली संचलनायास देण्यात आले आहेत.

मल्ल्याबरोबरच नीरव मोदी हा आणखी एक भारतीय उद्योगपती पीएनबी बॅंकेस "फसवून', 11 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करुन फरार झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: fugitive economic offenders bill nirav modi vijay mallya

टॅग्स

संबंधित बातम्या

You are my master my high command PM Modi says in Varanasi
तुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान

वाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती...

yeola
२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग

येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ...

yeola
वाळूमाफियांचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

येवला - राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीत शिकाऱ्यांपाठोपाठ वाळूमाफियांची दादागिरी सुरु झाली आहे.रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ममदापुर शिवारातील सोनार...

live photo
महापौरपदी सिमा भोळे बिनविरोध; सेनेचा बहिष्कार 

जळगाव ः जळगाव शहर महापालिकेत महापौरपदी भाजपच्या सिमा सुरेश भोळे, तर उपमहापौर म्हणून अश्‍विन सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेवर...

रुग्णावर तातडीने आपत्कालीन उपचार करणे बंधनकारक

मुंबई - पैसे न भरल्याचे कारण देत रुग्णाला किंवा उपचारादरम्यान दगावलेल्यांचे मृतदेह रुग्णालयांना यापुढे ताब्यात ठेवता येणार नाहीत. तसेच अपघातातील...