Sections

सुवर्णपदक विजेत्या पूनम यादववर वाराणसीत हल्ला

वृत्तसंस्था |   रविवार, 15 एप्रिल 2018
Punam Yadav

वाराणसी जवळील मुंगवार गावात पुनम तिच्या चुलतीच्या घरी गेली असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गावच्या प्रधानासोबत वाद झाला. त्यानंतर याचे रुपांतर मारहाणीत झाले.

वाराणसी : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पूनम यादव हिच्यावर वाराणसीत हल्ला करण्यात आला.

वाराणसी जवळील मुंगवार गावात पुनम तिच्या चुलतीच्या घरी गेली असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गावच्या प्रधानासोबत वाद झाला. त्यानंतर याचे रुपांतर मारहाणीत झाले. त्या प्रधानाच्या समर्थकांनी पुनमसह तिच्या भावार काठी, दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पुनम आपल्या कुटुंबीयांसह तेथून निघून आली. या हल्लात तिला कोणतीही जखम झालेली नाही. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी रोहनिया पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कुटुंबीयांमध्ये जुना वाद आहे. पुनम यामध्ये पडली असताना तिच्यावरही हल्ला करण्यात आला. पुनमने नुकतेच ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले होते. तिने एकूण 222 किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी केली होती.

Web Title: CWG gold medallist Punam Yadav attacked in Varanasi

टॅग्स

संबंधित बातम्या

The encroachment of both the directions of Ulhasnagar railway station has been removed
उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचा अतिक्रमणातून मोकळा श्वास

उल्हासनगर - हातगाड्या,फळांची टोपले, चष्मे, कटलरी, कंबरी पट्टे आदींचे ठेले थाटून अतिक्रमण करणाऱ्या व विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर आज प्रभाग...

Akshay Kumar Flim Gold Trailer Release
अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी...

शैक्षणिक "पंढरी' दहशतीच्या सावटात...! 

शतकोत्तर परंपरा लाभलेली जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था गेल्या तीन-चार दशकांपासून समांतर संचालक कार्यकारिणीच्या वादात अडकलेली आहे. संस्थेची...

cricese two groups in Sajanpuri area
पावसामुळे टळली दंगल; सजनपुरी भागात दोन गटात तुफान दगडफेक

खामगांव- मंदिरासमोर कचरा टाकण्यास मनाई केली असता दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना सजनपुरी भागात आज ता...

akhilesh.jpg
सरकारी बंगल्यात अखिलेशची मनमानी लूट

लखनौ : उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडण्याचा आदेश दिल्यानंतर राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती तसेच मुलायमसिंह यादव व अखिलेश...